शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाका वाढल्याने शीतपेयाला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:42 IST

लखमापूर : तालुक्याला दोन-तीन दिवसांपासून सूर्यनारायणाने उग्र रूप दाखविल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत, त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यात सूर्यनारायणाचे उग्र रूप

लखमापूर : तालुक्याला दोन-तीन दिवसांपासून सूर्यनारायणाने उग्र रूप दाखविल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत, त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे.दिंडोरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. परंतु सध्या सूर्यनारायणाने आग ओकायला सुरुवात केल्यामुळे सध्याच्या मितीला पारा जवळपास ३५ ते ३७ अंशाच्या वर जात असल्यामुळे नागरिकांना गारवा देणाऱ्या ठिकाणीची ओढ लागली आहे. तसेच कडक ऊन व तापमानाचे वाढणारे प्रमाण यामुळे आता तालुक्यातील खेडे व शहरी भागातील वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे जवळजवळ सहा ते सात महिने बाजूला ठेवलेले पंखे, कूलर यांना आता सुगीचे दिवस येऊ लागले आहे. रात्री थंडी व दिवसा कडक ऊन हे समीकरण आजही दिंडोरी तालुक्यात पाहायला मिळत आहे.साधारणपणे जुन्या जाणकारांच्या मतानुसार उन्हाची तीव्रता ही होळीनंतर वाढत असते. परंतु यंदा मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच सूर्यदेवतेने आग ओकायला सुरुवात केल्यामुळे यंदाचा उन्हाळा भयानक स्वरूपाचा येतो की काय, असा सवाल तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. उन्हाची काहिली आतापासूनच नागरिकांना असह्य होऊ लागली आहे.गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल :गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारे मातीचे माठ बाजारात दाखल झाले आहेत. उन्हाळ्यात थंड पाणी देणारे वेगवेगळ्या आकारांचे माठ बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने ग्राहक माट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहे. हे माठ साधारणपणे चांदवड तालुक्यातील रायपूर, सुकेणा, वैजापूर, कोपरगाव आदी ठिकाणांहून विक्रीसाठी दाखल झाले आहेत.तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी आता रसवंतिग्रहे फुलू लागली आहेत. यंदा दिंडोरी तालुक्यात उसांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदाच्या ुन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या कडेला रसवंतीची दुकाने थाटली आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्राहक वर्गाकडून वेगवेगळ्या शीतपेयांना मोठी मागणी वाढली आहे.

(१५ लखमापूर १)

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलRural Developmentग्रामीण विकास