शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

अलिबाग-शिर्डी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 18:28 IST

गेल्या वीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली अलिबाग-शिर्डी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्न घटल्याने सदर बस बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांना खासगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ आली आहे.

सिन्नर : गेल्या वीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली अलिबाग-शिर्डी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्न घटल्याने सदर बस बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांना खासगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ आली आहे.अलिबाग आगाराने गेल्या २० वर्षांपूर्वी अलिबाग-शिर्डी बस सुरू केली होती. कल्याण, पनवेल, नाशिक, सिन्नर, शिर्डी मार्गावर धावणारी सदर बससेवा अतिशय जुनी मानली जाते. कल्याण, पनवेल, नाशिक, सिन्नर, पांगरी, वावी, पाथरे व शिर्डी या मार्गाने धावणारी सदर बस या मार्गावर कामगार, वारकरी, प्रवासी व विद्यार्थ्यांसाठी सोयीची मानली जात होती. गेल्या वर्षापासून लालपरी बस बंद करून शिवशाही सुरू केल्याने उत्पन्न कमी मिळू लागले होते. त्यामुळे काही दिवसानंतर शिवशाही बंद करून अलिबाग आगाराने पुन्हा साधी बस सुरू केली होती; पण काही दिवसांपासून सदर बससेवा बंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ये-जा करणारे चाकरमाने व विद्यार्थ्यांचे या बसच्या चालक व वाहकांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. अलिबाग-शिर्डी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे गणेश पगार यांच्यासह प्रवासी सुनील लोढे, दीपक शिंदे, वैभव दळवी आदींसह विद्यार्थी व कामगारांनी केली आहे.अनेक वर्षांपासून या बसने ये-जा करणाºया प्रवाशांना बस बंद झाल्याची बातमी अस्वस्थ करून गेली. शिर्डी येथून सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अलिबागकडे निघणाºया या बसमध्ये कल्याण, पनवेल, नाशिकचे प्रवासी व सिन्नर, माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच सिन्नर महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. नोकरदार, कामगार व विद्यार्थ्यांसाठी ही बस अतिशय सोयीची होती.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक