शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

खरीप धोक्यात कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 22:37 IST

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला यासह नगदी पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : निम्मा पावसाळा होऊन गेला तरी नदीनाले अध्याप कोरडे ठाक

सायखेडा : निफाड सिन्नर सरहद्दीवर भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे या गावांना निम्मा पावसाळा होऊन गेला असला तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन, मका, भाजीपाला यासह नगदी पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहे.या परिसरात असलेली नद्या-नाले, ओहळ, विहिरी कोरडे ठाक पडले आहे, त्यामुळे या परिसराला जीवनदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री व दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे भेंडाळीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब कमानकर, ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल यांच्यासह निवेदन दिले आहे.कडवा कॅनॉलच्या लाभार्थी क्षेत्रात सद्या खरीप पिके धोक्यात आली आहे. पिके कोमेजून जात आहेत. शेतकऱ्यांनी हजारो रुपये भांडवल खर्च करुन शेतात पिके उभी केली आहे, मात्र आज कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. कर्ज काढून शेतकऱ्यांनी भांडवल उभे केले ते पूर्ण पिकांसाठी खर्च केले, आज मात्र डोळ्यासमोर पिके करपू लागली आहेत. भविष्यात पाऊस होईल की नाही हि शंका आहे, त्यामुळे रब्बीची शाश्वती नाही. आत्ता केवळ खरीप पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे, मात्र ती सुकून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.धरण क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरु आहे. धरण जवळपास ऐंशी टक्के भरले आहे. पिण्याच्या पाण्याचा आरक्षित कोठा तसाच ठेऊन उर्वरित पाणी सोडावे अशी मागणी मेलद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.त्यामुळे खरीपाचे पिक वाचविण्याकरीता कडवाला आवर्तन सोडण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल, सोमनाथ खालकर, गणेश शिंदे, जयवंत सातपुते, संतोष खालकर, मधुकर आढाव, बाळासाहेब खालकर, शशिकांत खालकर, कांतीलाल खालकर, संदीप सातपुते, ज्ञानेश्वर सातपुते, दिपक शिंदे, बबन कमानकर, शरद शिंदे, विलास शिंदे, छगन शिंदे, रवींद्र शिंदे , सागर खालकर, गोकुळ खालकर, संतोष कमानकर, बबन शिंदे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातagricultureशेती