शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कांदा निर्यात मूल्य कमी करण्याची मागणी

By admin | Updated: June 20, 2014 22:02 IST

पिंपळगाव :कांदा या शेतीमालास ७०० ते १८६१ असा साधारण भाव मिळत असूनही केंद्र शासनाने ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पिंपळगाव : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांदा या शेतीमालास ७०० ते १८६१ असा साधारण भाव मिळत असूनही केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य शून्य असताना ते ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य संपूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी माजी आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कमीत कमी ७०० व जास्तीत जास्त १८६१ व सरासरी १३११ असून , शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसतानादेखील केंद्र शासनाने अशा प्रकारे घाईघाईमध्ये कांद्यावरील किमान निर्यात मूल्य ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. असे पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी म्हटले आहे. सटाणा : कांदा निर्यात मूल्य ३०० डॉलरने वाढविल्याने कांद्याचे दर कमी झाले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असून, सदरची मूल्यवाढ रद्द करावी या आशयाची मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय प्रातांधिकारी संजय बागडे यांना देण्यात आले आहे. केंद्र शासनाने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे़प्रांताधिकारी बागडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे गत दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यात मूल्यात अचानक केलेली दरवाढ ही कांदा उत्पादकांवर अन्यायकारक ठरलेली आहे. दोन दिवसांपासून कांदा कमी भावात खरेदी होऊ लागला आहे. यावर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कांद्याचे उत्पादन घेत असताना उत्पादनात घट होऊन खर्चदेखील वाढला आहे. तुलनेने कांद्याला हवा तसा भाव नाही. मिळणारा भाव हा अत्यंत तुटपुंजा स्वरूपाचा आहे. नवेदनावर संजय पवार, देवीदास निकम, युवराज देवरे, नितीन वाघ, दीपक वाघ, संतोष पगार, आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)