शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जांभूळ फळाला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:17 IST

ग्रामीण भागात सध्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते.

ठळक मुद्देवातावरणातील बदलाचा फटका : गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर वाढले

लखमापूर : ग्रामीण भागात सध्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते.यंदा फळांचा राजा आंबा या फळाला चांगली मागणी होती; परंतु कोरोनामुळे आंब्याची चव आंबट झाली. त्यामुळे आंबा हंगामाचा आता जवळ जवळ शेवट होत असताना, ग्राहक वर्गातून पौष्टिक असलेल्या जांभूळ फळाला मागणी आहे. पावसाळा सुरू झाला की जांभळांना बहर येतो; परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे बहर कमी आल्यामुळे फळाची आवक कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. आयुर्वेदामध्ये जांभळाला महत्त्वाचे स्थान आहे. शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते. तसेच पावसाळी वातावरणात ते खाणे उत्तम मानले जाते.

२० किलोच्या जाळीचा ९०० रुपयांचा दरदरवर्षी जांभूळ फळ मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येते; परंतु यंदा हवामानातील बदल तसेच कोरोनामुळे बंद असल्यामुळे फळाची आवक कमी झालेली दिसून येत आहे. गतवर्षी जांभळाची २० किलोची जाळी साधारणपणे ५०० ते ६०० रु पयांपर्यंत विकली गेली यंदा मात्र ७०० ते ९०० रु पये मोजावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आम्ही दरवर्षी भरपूर प्रमाणात जांभूळ फळपीक घेतो. परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे झाडाला फळधारणा कमी आहे. यामुळे फक्त २० ते ३० टक्केच फळ हाताशी आले आहे. त्यामुळे शेतीसाठी मिळणारे भांडवलही पुरेशा प्रमाणात मिळू शकले नाही.- कोंडाजी पिंगळे, जांभूळ उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी