नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी अपनापन सहयोग मिशनच्या वतीने करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाला सुरुवात केली असताना, गोदावरी मात्र अद्याप प्रदूषित असून, गोदेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाने स्वच्छता अभियान सुरू करण्याची गरज असल्याचे सूरज भाटिया यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
गोदावरी प्रदूषण रोखण्याची मागणी
By admin | Updated: November 12, 2014 00:21 IST