नाशिकरोड : उपनगर परिसरात वाढती गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी उपनगरमध्ये पोलीस चौकी सुरू करावी, या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना देण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया युवक आघाडीचे जिल्हाप्रमुख ललित पाटील यांनी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपनगर, आगर टाकळी परिसराची लोकसंख्या तीस-चाळीस हजारापेक्षा जास्त असून, येथे विविध जाती-धर्माचे नागरिक राहतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून उपनगर, टाकळी परिसरात नेहमीच भांडणे, हाणामारी, वाहनांची जाळपोळ, खून, महिला-युवतींची छेडछाड, भाईगिरी अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला यांच्यामध्ये असुरक्षितता व दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्याठिकाणी तातडीने पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पोलीस चौकी उभारण्याची मागणी
By admin | Updated: December 1, 2015 22:31 IST