शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग बांधवांना पेन्शनचा लाभ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:13 IST

त्र्यंबकेश्वर शहरातील दिव्यांग तथा अपंग बांधवांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाने दरमहा पेन्शन लागू करावी, अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरातदेखील शेकडो दिव्यांग बांधव आहेत.

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरातील दिव्यांग तथा अपंग बांधवांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाने दरमहा पेन्शन लागू करावी, अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरातदेखील शेकडो दिव्यांग बांधव आहेत. दिव्यांग असल्यामुळे अनेक जण आपला उदरनिर्वाह करू शकत नाहीत. कोणाचे नातेवाईक चांगले असल्यास ते अशा दिव्यांगांना सांभाळतात. तथापि, अनेकांना ते बोजा वाटतात. साहजिकच असे लोक नकोसे होतात. काहींना उदरनिर्वाहाची चिंता वाटते. यासाठी शासनानेच त्यांना मदतीचा हात पुढे करावा. त्यांना पेन्शनचा लाभ तर द्यावाच शिवाय आवश्यक साहित्य उदा. अपंगांसाठीची सायकल, कुबड्या आदीदेखील पुरवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे आदींनी केली आहे.  शासनाने दिव्यांग बांधवांसाठी तीन टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात दिव्यांग बांधवांनी त्र्यंबकचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार व आरोग्य सभापती विष्णू दोबाडे आदींनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी दिव्यांग बांधवांच्या सर्व मागण्या रास्त असून, त्या मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.  यावेळी दिव्यांग हरिदास सोनवणे, लक्ष्मण करपे, काळू खोडे, हिरामण काळे, महेंद्र दोंदे, त्र्यंबक गमे, हर्षदा सोनार, शाकीर पठाण, शायना पठाण, रवींद्र पवार, शकुंतला काळे, भगवान गायकवाड, भगवानदास कासट, ऊर्मिला कासट आदी उपस्थित होते.योजनांची अंमलबजावणी करावीदिव्यांग बांधव कष्टाची कामे करू शकत नसल्याने त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, मतिमंद व अस्थिव्यंग बांधवांसाठी दरमहा पेन्शन चालू करावी. दिव्यांग बांधवांसाठी केंद्र शासन व राज्य शासन विकासासाठी अनेक उपयुक्त योजना राबवित आहे, त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या योजनांची कठोर अमंलबजावणी करावी. दिव्यांग बांधव अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त असतात त्यासाठी त्यांचे आरोग्य शिबिर घेऊन गरजेनुसार साहित्य वाटप करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक