शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगासाठी वेतनश्रेणी निश्चितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:38 IST

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारच्या समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीप्रमाणेच वेतनस्तर लागू करावा, असा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे.

नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारच्या समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीप्रमाणेच वेतनस्तर लागू करावा, असा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. मात्र, मनपातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात ज्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात आली त्याचाच आधार घ्यावा आणि त्यानुसारच वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.नागपूर येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेने सर्व कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांचे वेतन हे शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या वेतनापेक्षा अधिक असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.महासभेने वेतन आयोग मंजूर करण्याचा निर्णय घेतला असला तरी दरम्यानच्या काळात राज्य शासनाने आॅगस्ट २०१९ मध्ये राज्य शासनातील कर्मचाºयांना लागू असलेल्या वेतनश्रेणीच अन्य समकक्ष पदांना लागू राहतील, असा आदेश जारी केला आहे. त्यामुळे असे न करता पूर्वीप्रमाणेच कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी सेनेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण तिदमे आणि सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEknath Shindeएकनाथ शिंदे