शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

शिक्षक संघटनेची मागणी : बीएलओंच्या कामाचे करा नियोजननिवडणूक अधिकाºयांवर गुन्हे दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:09 IST

 नाशिक : प्राथमिक शिक्षकांनाच बीएलओ म्हणून नेमणूक देऊन त्यांच्याकडून मतदार यादीचे काम करवून घेतले जाते व कामात चुका झाल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, त्याच धर्तीवर कामात चुका झालेल्या निवडणूक अधिकाºयांवरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिक्षक संघटनेने केल्याने शिक्षक व महसूल खाते यांच्यातील वाद विकोपाला गेला ...

ठळक मुद्देशिक्षक संघटनेची मागणी : बीएलओंच्या कामाचे करा नियोजननिवडणूक अधिकाºयांवर गुन्हे दाखल करा!

 

नाशिक : प्राथमिक शिक्षकांनाच बीएलओ म्हणून नेमणूक देऊन त्यांच्याकडून मतदार यादीचे काम करवून घेतले जाते व कामात चुका झाल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, त्याच धर्तीवर कामात चुका झालेल्या निवडणूक अधिकाºयांवरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिक्षक संघटनेने केल्याने शिक्षक व महसूल खाते यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.सोमवारी या संदर्भात महाराष्टÑ राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांची भेट घेऊन त्यांना शिक्षकांच्या मागण्या व त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दोनपानी निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, बीएलओंच्या कामाचे कोणतेही नियोजन केले जात नाही, शैक्षणिक काम आटोपल्यावर त्यांच्यावर मतदार यादीचे काम सोपविण्यात आले असले तरी, शिक्षकांना त्यांची शैक्षणिक कामे शाळा आटोपल्यानंतरच करावी लागतात. कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक व माध्यमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षकांच्या मानाने कमी कामे असतात, त्यांना मतदार यादीचे काम का दिले जात नाही. मुळात प्राथमिक शिक्षकांकडे संपूर्ण वर्गाची जबाबदारी असते त्यांना बीएलओ बैठकांसाठी जाताना शाळा वाºयावर सोडावी लागते व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, त्याचाही विचार व्हावा. शिक्षकांनाच करावी लागतील कामेदरम्यान, शिक्षक आमदार कपील पाटील यांनी भारत निवडणूक आयोगाकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत केलेल्या पत्रव्यवहाराला निवडणूक आयोगाने उत्तर दिले असून, उत्तर प्रदेशीय प्राथमिक शिक्षक संघाने उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध केलेल्या न्यायालयीन लढ्यात न्यायालयाने शिक्षकांनाच निवडणुकीसंदर्भातील कामे करावी लागतील, असा निवाडा दिल्याचे पत्रच पाटील यांना पाठविले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची भविष्यातही सुटका होणे कठीण आहे.