शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

साकड नाला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

By admin | Updated: June 27, 2014 00:11 IST

साकड नाला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

 

देवळा : रामेश्वर-वाखारीरोड ते भिलवाड रस्ता (साकड नाला रस्ता) वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांनी माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर यांच्या मध्यस्तीनंतर व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या तीन दिवसांत कार्यवाही करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले. साकड नाल्यात अतिक्रमण केल्याने अनेकवेळा तहसीलदारांकडे तक्र ार करूनही उपयोग होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी उपोषण सुरू केले होते. यात साहेबराव नामदेव निकम, सोमनाथ कारभारी शिंदे , दादाजी चिंधा भामरे, निंबा सोनू निकम, उत्तम सोनू निकम, भास्कर दाजी निकम, अमृता चंद्रभान शिरसाठ, पांडुरंग वामन अहेर, सुरेश मोतीराम गोसावी, शंकर बाबूराव अहिरे आदि दहा शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून देवळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. तीन दिवस होऊनही शासनाचा अधिकारी उपोषणस्थळाकडे न फिरकल्याने अहेर यांनी मध्यस्थी करून उपविभागीय अधिकाऱ्यास बोलावून घेतले. सर्वांची भूमिका समजावून घेत तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यास मोजणीची फी भरण्याची मुदत देण्यात येईल व त्याकाळात त्याने फी भरली नाही, तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शासकीय मोजणीबाबत आदेश देऊन रस्ता खुला करण्यात येईल,असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. यावेळी झालेल्या चर्चेत दौलतराव अहेर, वाखारीचे माजी सरपंच मंगेश अहेर, सामाजिक कार्यकर्ते निंबाजी अहेर, नाशिक मनपाचे प्रभाग सभापती डॉ. राहुल अहेर, तहसीलदार शर्मिला भोसले, नीलिमा अहेर, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील देवरे, जिल्हा नेते दिनेश देवरे, संजय निकम, भिवराज शिरसाठ, मोठाभाऊ भामरे, हरी अहेर, योगेश भामरे, बाजीराव शिरसाठ आदिंनी सहभाग घेतला. दरम्यान, आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना अलकाबाई शिंदे, प्रमिला देवरे, शोभा शिरसाठ, रंजना शिरसाठ, सुनंदा भामरे, रत्नाबाई निकम, जानकाबाई निकम, तुळसाबाई निकम, वानूबाई निकम, सरूबाई देवरे, कमळाबाई देवरे, जयश्री निकम, जिजाबाई निकम आदिंसह शेकडो महिलांनी पाठिंबा दिला होता. (प्रतिनिधी)