सातपूर : दोन हजार रु पयाची नोट रद्द करण्यात यावी, सामान्य नागरिकांना अत्यावश्यक तेवढ्या शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध करून द्याव्यात यांसह विविध मागण्यांचे निवेदन माकपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चलनातून पाचशे आणि हजार रु पयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी जनतेला मुबलक व आवश्यक तेवढ्या शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध करून द्याव्यात, दोन हजार रुपयांची नोट रद्द करण्यात यावी, जाहीर केल्याप्रमाणे परदेशातील काळा पैसा देशात आणावा आणि प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रु पये जमा करावेत, राष्ट्रीयीकृत बँकांमधील टॉप टेन कर्ज बुडविणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, एनपीए ९ लाख कोटी वसूल करून अर्थव्यवस्थेत आणावा, काळा पैसा बाळगणारे व निर्णयानंतर तो पांढरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक निर्बंध लादण्यात यावेत, अशी मागणी माकपाचे शहर चिटणीस अॅड. वसुधा कराड, अॅड. तानाजी जायभावे, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे यांनी उपजिल्हाधिकारी सरिता नरके यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शंभरच्या नोटा उपलब्ध करून देण्याची मागणी
By admin | Updated: November 16, 2016 01:25 IST