शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

कांदा निर्यात बंदी उठविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 5:16 PM

सिन्नर : राज्य सरकारने केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी त्वरीत उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबवावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज कांदा दरात या हंगामातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार हजार रूपये प्रती क्विंटल असा दर होता तो आज सरासरी दोन हजार दोनशे इतका झाला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी त्वरित उठवून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार नरेंद्र वाघ यांना देण्यात आले.यावेळी नवनाथ बर्के, प्रकाश काकड, किरण बर्के, संतोष कापडी, शरद आव्हाड, योगेश बर्के,शिवनाथ कापडी, ज्ञानेश्वर कापडी, भाऊसाहेब कांगणे, भगवान सानप, शरद बर्के, हरीओम कापडी यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी