पाळे खुर्द : कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थाई व अस्थाई अशी २९ पदे रिक्त असून ती तात्काळ भरण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. कळवण हा शंभर टक्के आदीवासी बहुल तालुका असल्याने मोठ्या प्रमाणात आदिवासी तसेच गोरगरीब जनता खेड्या पाड्यावरून ह्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात परंतु रुग्णालयात अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णांना सरळ बाहेर उपचारासाठी जावे लागत असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. कमी असलेल्या रिक्तपदांमुळे उपस्थीत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक्त ताण पडत आहे. एवढे असूनही कामाचा दर्जा चांगला असल्यामुळे तीनवेळा आंनदीबाई जोशी पुरस्काराने उपजिल्हा रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात १०४ स्थायी व अस्थायी मंजुर पदे आहेत. त्यात ७५ पदे भरलेली तर २९ पदे रिक्त आहेत . त्याचप्रमाणे प्रती नियुक्तीवर वैधकीय अधिकारी २ व वर्ग ३ आणि वर्ग ४ चे १० असे १२ कर्मचारी असुन प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मुळ जागी पाठविण्याची मागणी वेळोवेळी वरीष्ठ स्तरावर करण्यात आली असून सुद्धा अद्यापही ही पदे भरली गेलेली नाही. तरी प्रशासनाने कळवण उपजिल्हा रुग्णालयात रिक्तपदे भरुन रूग्णांची हेळसांड थांबविण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.रिक्तपदे त्वरित भरण्याची गरज असून पदे भरल्यामुळे रुग्णालय सुरळीत चालू होऊन बाकीच्या कर्मचाऱ्यांवर जो अतिरिक्त ताण पडतो तो कमी होईल व रुग्णांवर उपचार करण्यास सोपे जाईल.- डॉ. शरदसिंग परदेशी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय,कळवण.
उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कळवणकरांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:47 IST
पाळे खुर्द : कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थाई व अस्थाई अशी २९ पदे रिक्त असून ती तात्काळ भरण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कळवणकरांची मागणी
ठळक मुद्दे रुग्णांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.