शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणी आरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:25 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून महापालिकेने यंदा ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली आहे. मागील वर्षी महापालिकेने गंगापूरमधून ४२०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असता ३९०० दलघफू आरक्षणाला मान्यता दिली होती. त्यामुळे महापालिकेला आरक्षित पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागला होता. यंदा पालिकेने धरणातून वाढीव ४०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून महापालिकेने यंदा ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली आहे. मागील वर्षी महापालिकेने गंगापूरमधून ४२०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असता ३९०० दलघफू आरक्षणाला मान्यता दिली होती. त्यामुळे महापालिकेला आरक्षित पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागला होता. यंदा पालिकेने धरणातून वाढीव ४०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे. महापालिकेने गेल्या वर्षी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूरमधून ४२०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती परंतु, जलसंपदा खात्याने गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती. महापालिकेने २९० दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाण्याचा पूर्णपणे वापर केला होता. यापुढे पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीसाठी गंगापूर धरणाच्या पाणी आरक्षणासंदर्भात जलसंपदा विभागाकडे वाढीव पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे. यंदा गंगापूर धरणातून ४३०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू याप्रमाणे एकूण ४६०० दलघफू पाण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१५ मध्ये गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला सोडण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यावेळी पाणी आरक्षण निश्चित करण्यावरूनही महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विरुद्ध शासन असा सामनाही रंगला होता. सन २०१६ मध्ये समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आवर्तनावरून वादाचा प्रसंग आला नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती. यंदाही महापालिकेने त्याच मागणीवर ठाम राहत नोंदणी केली आहे. यंदा गंगापूर धरणात ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गंगापूरमधून वाढीव पाणी आरक्षणाच्या मागणीबाबत जलसंपदा खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दारणातील पाणी आरक्षणाचा प्रश्नमहापालिकेसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित केले जात असले तरी आजवर केवळ ३०० दलघफूच्या आसपासच पाणी उचल करू शकले आहे. ज्यावेळी चेहेडी बंधाºयाला आवर्तन असते त्याचवेळी पाणी उचल करता येते. त्यामुळे दारणातील पाणी आरक्षणाचा फारसा उपयोग महापालिकेला होत नाही. त्यासाठीच महापालिकेने दारणातील आरक्षण कमी करून ते गंगापूर धरणात वाढवून देण्याची मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. यंदाही महापालिकेला आरक्षित ४०० दलघफू पाण्यापैकी २७४.३२ दलघफू पाणीच उचलता आले आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा ३०० दलघफू पाण्याचीच मागणी केली आहे.