शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्था सक्षमीकरणासाठी कार्यक्र म राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:30 IST

सिन्नर : राज्यातील सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती भक्कम राहण्यासाठी सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्य सहकारी समितीला चौदा कलमी कार्यक्र माच्या उपाययोजनांचे निवेदन पाठविण्यात आले. त्याची अंमलबजावणी झाल्यास सहकाराची स्थिती अधिक भक्कम होईल, असे फेडरेशनचे अध्यक्ष अंबादास वाजे, सचिव नामकर्ण आवारे यांनी म्हटले आहे.

सिन्नर : राज्यातील सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती भक्कम राहण्यासाठी सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्य सहकारी समितीला चौदा कलमी कार्यक्र माच्या उपाययोजनांचे निवेदन पाठविण्यात आले. त्याची अंमलबजावणी झाल्यास सहकाराची स्थिती अधिक भक्कम होईल, असे फेडरेशनचे अध्यक्ष अंबादास वाजे, सचिव नामकर्ण आवारे यांनी म्हटले आहे.नोटाबंदीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले आहेत. यात पतसंस्थांच्या व्यवहारावरदेखील प्रतिकूल परिणाम झालेला असताना त्यावर मात करून पतसंस्थांचे अर्थचक्र पुन्हा कार्यरत झाले होते, मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामांमुळे बँकिंग व्यवस्थेची गती मंदावली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, ग्रामपंचायत हद्दीतील घरांवर कर्ज देण्याबाबत सुविधा पूर्ववत करावी, कर्जाचे गहाणखतावरील मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ करावे, विशेष वसुली अधिकाऱ्यास पोलीस संरक्षण द्यावे, कर्जबुडव्यांना आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, आदींसह १४ उपाययोजना निवेदनात सुचविण्यात आल्या आहेत. त्यांचा तत्काळ पाठपुरावा करावा, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष वाजे व सचिव आवारे यांनी केली आहे.--------------रोख विड्रॉल रकमेवरील दोनटक्के टीडीएस कपात रद्द करावी, राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवलेल्या ठेवींवर मिळालेले व्याज आयकरमुक्त करावे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका पुनरु ज्जीवित कराव्यात,ठेवींना संरक्षण देण्यासाठी विमा महामंडळास केंद्र सरकारने भांडवली अनुदान द्यावे.-----------पतसंस्था नियामक मंडळ रद्द करावे, पतसंस्थेला नियामक मंडळाने तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेले अंशदान कायमस्वरूपी रद्द करावे, दैनंदिन कामकाजात राखावयाचा रोख तरलता निधी तरतुदीमध्ये दुरु स्ती करून मंजूर आदर्श पोटनियम क्र . ५२ मधील तरतुदी लागू करणे.

टॅग्स :Nashikनाशिक