शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

आयमात जिल्हा उद्योगमित्र सभा घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:41 IST

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या व अडचणींबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी घेण्यात येत असलेली जिल्हा उद्योगमित्र सभा (झुम) यापुढील काळात आयमाच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये घ्यावी याबाबत शिष्टमंडळाने नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

सिडको : अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या व अडचणींबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी घेण्यात येत असलेली जिल्हा उद्योगमित्र सभा (झुम) यापुढील काळात आयमाच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये घ्यावी याबाबत शिष्टमंडळाने नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये लघुउद्योजकांची संख्या अधिक आहे. लघुउद्योजकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांना व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लघुउद्योजकांच्या बहुतांश समस्या व अडचणींच्या उपाययोजना जिल्हा उद्योगमित्राच्या बैठकीत केल्या जातात व त्यांची सोडवणूक केली जाते. त्यामुळे सदर बैठक आयमाच्या सभागृहात घेतल्यास उद्योजकांना अडचणी मांडून त्यांची सोडवणूक होण्याची अपेक्षा शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उन्मेश कुलकर्णी, राजेंद्र पानसरे, दिलीप वाघ, गोविंद झा आदी उपस्थित होते.उपाययोजना कराव्यातअंबड औद्यागिक वसाहतीमधील अग्निशामक केंद्र सुरू करावे, तळेगाव अकाळे येथील औद्योगिक वसाहतींतील डिफेन्स हबसाठी जागा आरक्षित करावी, जुने पथदीप बदलून नवीन पथदीप यंत्रणा कार्यान्वित करावी याबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन व्हावे, स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात यावी याबाबत झुमच्या बैठकीत चर्चा करण्यात यावी याबाबतही निवेदनाद्वारे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांना सुचित करण्यात आले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक