शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

शिल्लक उन्हाळी कांद्याला एक हजार रूपये अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 17:29 IST

देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक असून ह्या कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील ...

ठळक मुद्देउन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक असून ह्या कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शिल्लक असलेल्या उन्हाळी कांद्याला शासनाने १००० रू प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील भऊर, वाजगाव, लोहोणेर, खामखेडा, सावकी, वासोळ, मेशी, दहिवड, उमराणे, वडाळे, कनकापूर, खर्डा आदी गावातील शेतकºयांनी दुष्काळ तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल हया अपेक्षेने मोठ्या प्रमाणात चाळीत कांदा साठवणुक करून ठेवला होता.मध्यंतरी ह्या उन्हाळी कांद्याचे दर काही काळासाठी दोन हजार रु पये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. शेतकºयांना कांदा विक्र ीतून आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी हा दर योग्य होता. परंतु त्यावेळी कांदा विकण्याची घाई करू नका, यापुढेही कांद्याचे दर वाढतील असे भाकीत वर्तविले गेले.सोशल मिडीयावर शेकडो स्वयंघोषित तज्ञांनी याबाबत उलटसुलट पोष्ट टाकून चुकीचे संदेश सर्वत्र पसरवले. यामुळे शेतकरी द्विधा मनिस्थतीत सापडून त्यांना अजून कांद्याचे दर वाढतील असा आशावाद बाळगत कांदा विक्रीसाठी योग्य परिस्थिती असतांना देखील कांद्याची विक्रि केली नाही. याबाबत अनेक शेतकर्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होते. परंतु पोळ कांदा बाजारात आल्यानंतर उन्हाळी कांद्याचे दर वाढण्याऐवजी ते सातत्याने कमी होत गेले. उन्हाळी कांद्याची मागणी घटल्यामुळे मातीमोल भावाने तो विकण्याची वेळ शेतकºयांवर आली. यामुळे हया शेतकºयांना कुटुंबातील सदस्यांची बोलणी ऐकावी लागून मनस्ताप भोगावा लागत आहे.अनेक ठिकाणी शेतकºयांचा उद्रेक बघावयास मिळाला. तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकरी पंढरीनाथ मेधने यांनी लिलावात उन्हाळी कांदा १०५ रुपये प्रतिक्विंटल पुकारल्यामुळे उद्विग्न होऊन विक्र ीसाठी आणलेला दोन ट्रॉली कांदा देवळा येथे पाच कंदील चौकात विंचूर प्रकाशा महामार्गावर ओतून देत शासनापर्यंत शेतकºयांच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न केला.चौकट... पीक पाहणी सदोष पद्धतीने होत असल्यामुळे वरीष्ठ कार्यालयाकडे पीक लागवडीची व उत्पादनाची चुकीची आकडेवारी पाठवली जाते. काही अपवाद वगळता ग्रामीण स्तरावर काम करणारे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी न करता मागील वर्षाच्या कागदपत्रांचा आधार घेऊन पीक पाहणीची माहिती तयार करतात व वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवून देतात.ह्या आलेल्या माहीतीच्या आधारे शासन आयात निर्यात धोरणासंबंधी निर्णय घेते. त्याचा शेतकºयांना भुर्दंड सोसावा लागतो अशी तक्र ार कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.चालू वर्षी दुष्काळामुळे उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. तयार कांद्याच्या रोपांना देखील मागणी नाही. यामुळे हा कांदा रोपे तयार करण्यासाठी केलेला खर्च देखील वाया गेला आहे. उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.