शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

आरक्षणासह आर्थिक विकास महामंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:57 IST

राज्य सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता मुस्लीम तसेच धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे़ बुद्धिवादी म्हणून ओळख असलेल्या ब्राह्मण समाजालाही आता बदलत्या काळानुसार आरक्षणाची नितांत आवश्यकता असून,

नाशिक : राज्य सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता मुस्लीम तसेच धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे़ बुद्धिवादी म्हणून ओळख असलेल्या ब्राह्मण समाजालाही आता बदलत्या काळानुसार आरक्षणाची नितांत आवश्यकता असून, तत्पूर्वी युवती व महिलांची सुरक्षितता तसेच तरुणांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी ब्राह्मण समाजाच्या महाचर्चेतून रविवारी (दि़२३) समोर आली़ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या त्र्यंबकरोडवरील अभ्यंकर सभागृहात ‘ब्राह्मण समाजास आरक्षण हवे की नको’ या विषयावर महाचर्चा घेण्यात आली़ या महाचर्चेनंतर सहा ठराव पारीत करण्यात आले असून, पूर्ततेसाठी दबावगट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत़पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी ब्राह्मण समाजाने प्रांत व शाखाभेद विसरून एकमेकांमध्ये रोटी-बेटीचा व्यवहार करणे आवश्यक असल्याचे सांगितले़ तसेच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरले असून, जोपर्यंत समाजाच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुकीत मतदान न करण्याची तसेच दबावगट तयार करण्याची सूचना मांडली़ सरकारने मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरू केले असून, आरक्षणाच्या मागणीपूर्वीच निर्माण झालेल्या नोकऱ्यांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित करून उद्योगाकडे वळण्याचे आवाहन निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले़ तर देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सरस्वतीला लक्ष्मीची जोड आवश्यक असून, यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले़गुजरातमधून ब्राह्मण आरक्षणाचा मुद्दा समोर आला असून ही काळाची गरज आहे़ शिक्षण वा नोकरीमध्ये आरक्षण नाही तसेच विद्यार्थी अभ्यास करून जास्त टक्के पाडतात, मात्र त्यांना प्रवेश मिळत नाही़ समाजाला आरक्षण आवश्यक असले तरी त्यापूर्वी समाजातील युवकांच्या प्रगतीसाठी सर्वप्रथम आर्थिक विकास महामंडळ तसेच महिला व युवतींची सुरक्षितता आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश गोखले होते़ व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह उदयकुमार मुंगी, नगरसेवक दीपाली कुलकर्णी व अ‍ॅड़ श्यामला दीक्षित, अ‍ॅड. भानुदास शौचे, अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, माधव भणगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उदयकुमार मुंगी यांनी तर सूत्रसंचालन सुभाष सबनीस यांनी केले.मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणारे ठरावदेशातील विविध जाती-जमातींच्या आरक्षणास ब्राह्मण समाजाचा विरोध नाही़ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून योग्य पाठबळ, शासकीय योजना व विशेष सवलती ब्राह्मण समाजास मिळणे आवश्यक असून त्यासाठी समाज एकत्र आला आहे़ब्राह्मण समाजासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाची तातडीने स्थापना करावी़ब्राह्मण समाजाकरिता सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक सवलती योजना जाहीर करून निधी देण्यात यावा़देशातील महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करावी़पुरोहित वर्ग, वेद पाठशाळा व आर्थिक दुर्बल घटकांच्या मानधनासाठी योजना आखून अंमलबजावणी करण्यात यावी़

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार