शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:16 IST

भर रस्त्यातील वाकडे- तिकडे लावलेले बॅरिकेडिंग पोलिसांनी तसेच ठेवल्याने सुनील मटाले या शिक्षकाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास चोपडा लॉन्ससमोर घडली होती़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरलेल्या मटाले यांच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाºयांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन देणार आहे

नाशिक : भर रस्त्यातील वाकडे- तिकडे लावलेले बॅरिकेडिंग पोलिसांनी तसेच ठेवल्याने सुनील मटाले या शिक्षकाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास चोपडा लॉन्ससमोर घडली होती़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरलेल्या मटाले यांच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाºयांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन देणार आहे  व्ही. एन. नाईक महाविद्यालयात आयटीआय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुनील मटाले हे पोलिसांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणाचा बळी ठरले आहेत़ मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विवाह समारंभ आटोपून यामाहा दुचाकीने (एमएच १५, बीए ६२८२) हनुमानवाडीतील आपल्या घराकडे परतत होते़ रात्रीच्या अंधारात चोपडा लॉन्ससमोर पोलिसांनी भर रस्त्यात लावलेल्या बॅरिकेडिंगचा मटाले यांना अंदाज न आल्याने ते थेट त्यावर जाऊन आदळले. एका बॅरिकेडचा पत्रा मटाले यांच्या डोक्यात शिरल्याने ते गंभीर जखमी झाले यात त्यांचा मृत्यू झाला़  सरकारवाडा पोलिसांनी मटाले यांचा अपघाताबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यात रस्ते दुभाजकाला दुचाकी आदळून अपघात झाल्याची नोंद केली आहे़ मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावरील बॅरिकेडिंगला धडकून मटाले यांचा मृत्यू झाल्याचे फोटोही नातेवाइकांनी ‘लोकमत’कडे पाठविले आहेत़ पोलिसांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी चुकीचा गुन्हा नोंदविण्याबरोबरच रात्रीतून बॅरिकेडिंग हटविले़  तसेच अपघातस्थळाहून पंचनामा न करताच मटाले यांची दुचाकी पोलीस ठाण्यात नेली़ कर्तव्यात कसूर करणाºया पोलीस कर्मचाºयांविरोधात पोलीस आयुक्तांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मटाले यांच्या कुटुंबीय  व नातेवाइकांनी निवेदनाद्वारे केली आहे़मटाले यांचा मृत्यू दुभाजकावर आदळून नव्हे तर पोलिसांनी रस्त्यावर ठेवलेल्या बॅरिकेड्समुळे झाला आहे़ मात्र, अपघातानंतर रात्रीच ते घटनास्थळावरून उचलून नेण्यात आले़ तसेच एरवी अपघातानंतर घटनास्थळी पंचनामा करणाºया पोलिसांनी मात्र तत्परता दाखवत दुचाकी आणि बॅरिकेड्स दोन्ही उचलून नेले़ कर्तव्यात कसूर करणाºया संबंधित पोलीस कर्मचाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देणार आहोत़  - किशोर सिरसाट ,  मटाले यांचे नातेवाईक

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय