शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी थेट जर्मनीहून नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 11:28 IST

‘वोट कर नाशिककर’सारख्या अभियानांमार्फत जिल्हा प्रशासनाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्दे‘स्मार्ट’ पध्दतीने वोटर हेल्पलाईनचा वापर देशाला बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा,

नाशिक : सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताचे निवासी होण्याचे कर्तव्य बजावत लोकशाहीने दिलेला मतदानाच हक्क अदा करण्यासाठी थेट जर्मनीहून फुलसे दाम्पत्य नाशकात शुक्रवारी (दि.२६) दाखल झाले. त्यांनी सोमवारी सकाळी इंदिरानगरमधील आपल्या मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला.‘वोट कर नाशिककर’सारख्या अभियानांमार्फत जिल्हा प्रशासनाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे. नाशिक शहारात मतदार याद्यांमध्ये नावांचा घोळ, घरपोच मतदार चिठठया न मिळाल्याच्या तक्रारी असतानाही नाशिककर मोठ्या उत्साहाने ‘स्मार्ट’ पध्दतीने वोटर हेल्पलाईनचा वापर करत मतदार ओळखपत्राच्या क्रमांकावरून यादी भाग व अनुक्रमांक शोधत बुथ चा नाव पत्ताही माहिती करून घेताना दिसून येत आहे. यामुळे मतदान केंद्रात पोहचून नागरिक आपले मतदार ओळखपत्र दाखवत यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक सांगून मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान जनजागृतीचा प्रभाव दिसून येत असून नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशात राहणाऱ्या भारतीय नाशिककर नागरिक ांनीसुध्दा मतदानासाठी मुळ गावी येऊन सकाळी मतदान केले. सेंट फ्रान्सिस्को, जर्मनी येथून शहरात दाखल होत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.चेतनानगरमधील रहिवासी असलेले मिलींद फुलसे हे मागील काही वर्षांपासून नोकरीनिमित्त जर्मनी येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नी वैशाली फुलसे यादेखील त्यांच्यासोबतच राहतात. त्यांनी येथील जाजू विद्यालयात सकाळी हजेरी लावून आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आनंद व्यक्त करत मतदाराचा हक्क बजावल्याचा मनापासून आनंद होत असल्याचे सांगितले. २९ एप्रिल रोजी नाशिक लोकसभा मतदार संघात मतदान होणार असल्याचे माहिती मिळताच तसे नियोजन सुरू करून पत्नीसह शुक्रवारी इंदिरानगरमध्ये दाखल झालो. उत्सुकता खूप होती. सकाळी पत्नी वैशालीला घेऊन मतदान केंद्रात पोहचलो अन् लोकशाहीने दिलेला अधिकार गाजवून आलो, अशा भावना मिलिंद यांनी बोलून दाखविल्या. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार तर आहेच, मात्र क र्तव्यदेखील आहे, हे विसरून चालणार नाही. देशाला बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे वैशाली यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकVotingमतदान