शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पांगरीकरांचा रस्ता रुंदीकरणास विरोध उड्डाणपूल किंवा बायपासची मागणी : भूमिअभिलेखच्या पथकाला धाडले माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:19 IST

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्ग चौपदरीकरणासाठी मोजणीच्या कामाला आलेल्या भूमिअभिलेख खात्याच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या पथकाला संतप्त पांगरीकरांनी गावठाण हद्दीतील मोजणी करू न देता माघारी धाडले.

ठळक मुद्दे पांगरीकरांचा रस्ता रुंदीकरणास विरोध भूमिअभिलेख खात्याच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या पथकाला संतप्त पांगरीकरांनी मोजणी करू न देता माघारी धाडले.

सिन्नर-शिर्डी महामार्ग चौपदरीकरणाच्या मोजणीसाठी आलेल्या पथकासोबत चर्चा करताना पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांच्यासह पांगरीचे ग्रामस्थ.

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्ग चौपदरीकरणासाठी मोजणीच्या कामाला आलेल्या भूमिअभिलेख खात्याच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या पथकाला संतप्त पांगरीकरांनी गावठाण हद्दीतील मोजणी करू न देता माघारी धाडले.सिन्नर - शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरण होणार असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यासंदर्भात वृत्तपत्रातून मोजणीसाठी नोटीस देण्यात आली आहे. पांगरी गाव सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुतर्फा वसलेले आहे. गावातून जाणाºया महामार्गाच्या कडेला रहिवासी घरे व व्यावसायिक दुकाने आहेत. या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे अनेक राहती घरे व दुकाने उद्ध्वस्त होण्याची भीती पांगरी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.रस्ता मोजणीसाठी व मार्किंग करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी गुरुवारी पांगरी शिवारात पोहचले. याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांच्यासह प्रकाश पांगारकर, विलास निरगुडे, शिवाजी कांडेकर, राजू पगार, विष्णू निरगुडे, जनार्दन कलकत्ते, सुभाष पांगारकर, ज्ञानेश्वर पगार, भारत आवारी, दत्तू दळवी, सुनील पगार यांच्यासह ग्रामस्थांनी सुमारे एक किलोमीटर अंतर जाऊन या मोजणीची माहिती घेतली. सदर महामार्गाची पांगरी गावातून दुतर्फा मोजणी केली जाणार असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले.त्यांनी मोजणीसाठी आलेल्या कर्मचाºयांना गावठाण हद्दीतील मोजणी न करता माघारी जाण्यास सांगितले. त्यानंतर मोजणी बंद करून कर्मचाºयांनी वरिष्ठांसोबत संपर्क साधला. त्यानंतर काही अधिकाºयांनी पांगरी येथे येवून ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मात्र ग्रामस्थांनी बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती व्यक्त करीत मोजणीस आक्षेप घेतला. त्यानंतर अधिकाºयांनी पांगरी गावठाण हद्दीतील मोजणी न करता पुढील वावी गावाच्या दिशेने मोजणी करण्याची निर्णय घेतला. खासदार हेमंत गोडसे व पांगरी ग्रामस्थांची चर्चा करुन त्यातून मार्ग काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.पांगरी गावातून महामार्ग करतांना रहिवासी घरे व दूकाने वाचविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पांगरीकरांनी मोजणीला विरोध केला. त्यामुळे अधिकाºयांना पांगरी गावठाण हद्दीतील मोजणी न करता पुढील कामासाठी रवाना व्हावे लागले.महामार्ग रुंदीकरणाऐवजी उड्डाणपूल किंवा बायपास करण्याची मागणी पांगरी ग्रामस्थांनी राष्टÑीय महामार्गाच्या अधिकाºयांकडे व संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली होती. गेल्या दोन दिवसांपासून मुसळगाव हद्दीपासून शिर्डीच्या दिशेने रस्ता मोजणीच्या व मार्किंगच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.