शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी

By admin | Updated: June 19, 2017 00:58 IST

विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलोहोणेर : देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील ग्रामशिक्षण समितीच्या श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम त्वरित करण्यात यावे तसेच विद्यालयाची गुणवत्ता सुधारण्यात येऊन सर्व सोयींयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा आशयाचे निवेदन खुंटेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देवरे यांना देण्यात आले. खुंटेवाडी येथे १९७९-८० पासून उमराणा येथील ग्रामशिक्षण समितीचे श्रीराम माध्यमिक विद्यालय कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे व गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीराम विद्यालयाची मुहूर्तमेढ त्यावेळी रोवली आहे. जिल्ह्यातील मान्यवर अशा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेबरोबरच देवळा एज्युकेशन सोसायटीने खुंटेवाडी येथे माध्यमिक विद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ग्रामस्थांनी ग्रामशिक्षण समितीला त्यावेळी प्राधान्य दिले होते. गेल्या २५ वर्षांपासून ग्रामस्थांनी विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी व भौतिक सुविधांच्या उपलब्धतेबाबत अनेकवेळा लेखी, तोंडी मागणी केलेली आहे परंतु आतापर्यंत ग्रामस्थांच्या पदरी घोर निराशाच आली आहे. विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्थाचालक व ग्रामस्थांमध्ये समायोजन होणे गरजेचे असून सध्यस्थितीत विद्यालयाची स्वतंत्र व सुसज्य इमारतीचे बांधकाम होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना शालेय वातावरण पोषक उपल्बध व्हावे यासाठी विद्यालयाची स्वतंत्र, सुसज्य व सर्व सोयींयुक्त अशी इमारत होणे अपेक्षित आहे. यासाठी संस्थेच्या वतीने तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. चांदवड -देवळाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी खुंटेवाडी गाव दत्तक घेतले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाची वाटचाल आदर्श गावाकडे चालू आहे. आदर्श गावाला साजेशे असे माध्यमिक विद्यालय गावात कार्यरत असावे, अशी सर्व ग्रामस्थांची रास्त मागणी आहे.