शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या दिव्यांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:32 IST

दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व पणत्या आणि विविध आकारांतील आकर्षक दिव्यांना असल्याने यंदाही बाजारात विविध प्रकारचे दिवे, पणत्या पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी वाढली असून, यात वेगळे आकार, लहान-मोठ्या पणत्या, प्राण्यांची चित्र, धनलक्ष्मी यांसारखे पर्याय आहेत.

नाशिक : दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व पणत्या आणि विविध आकारांतील आकर्षक दिव्यांना असल्याने यंदाही बाजारात विविध प्रकारचे दिवे, पणत्या पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी वाढली असून, यात वेगळे आकार, लहान-मोठ्या पणत्या, प्राण्यांची चित्र, धनलक्ष्मी यांसारखे पर्याय आहेत.  दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने त्याला दीपोत्सव असे म्हटले जाते. यात आकाशकंदिलानंतर येतात त्या पणत्या आणि दिवे. या दिवाळीत नाशिकच्या बाजारामध्ये मातीच्या साध्या पणत्यांबरोबरच पणत्यांची थाळ, दिव्यांची माळ, मातीची समई, हत्तीवर दिवा घेऊन बसलेली लक्ष्मी, मातीचे झुंबर यांसारखे प्रकार पहायला मिळतात. यांच्या किमती साधारण १५ रुपये डझनपासून सुरू होऊन हजार रुपयांपर्यंत आहेत. ज्या ठिकाणी मातीच्या पणत्या मिळतात, त्याच ठिकाणी हे दिवेदेखील उपलब्ध आहेत. अनेक घरांमध्ये रांगोळीबरोबर ठेवण्यासाठी दिवे वापरले जातात. म्हणून या दिव्यांवर विशेष सजावट केलेली पहायला मिळते. कुंदन, मोती यांचा वापर करून पणत्या आणि मोठ्या दिव्यांवर सजावट केलेली आहे. सजावटीप्रमाणेच किमतीदेखील वाढलेल्या दिसतात.याशिवाय तेल बचत करणारे, तसेच तेलाच्या डागांपासून वाचू पाहणाऱ्यांसाठी फ्लोटिंग कँडलचा पर्याय आहे. दिव्यांसाठी नाशिकची मुख्य बाजारपेठ म्हणजेच रविवार कारंजा, मेनरोड याशिवाय गंगापूरनाक्यावरील सिग्नलवरदेखील दुकाने पहायला मिळतात. दिवाळीनिमित्त बाजारात आलेल्या आकर्षक दिव्यांची खरेदी करताना महिला. यावर्षी सजविलेल्या पणत्यांना मागणी. यावर्षी पर्यावरणपूरक वस्तूंना मागणी वाढलेली दिसते आहे. मातीच्या पणत्या असल्या तरी त्यांना सुरेख सजावट केलेली असल्यास त्याला मागणी आहे. यावर कुंदन वर्क किंवा मोती वर्क असल्यास जास्त पसंती मिळत आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिक