शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 23:00 IST

येवला : गत १५ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे भाजप सरकार दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करत आहे.

येवला : गत १५ दिवसांत पेट्रोल- डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात केलेली वाढ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये अन्यायकारक वाढ केल्यामुळे सामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर गडगडलेले असतानाही केंद्र सरकारने सातत्याने इंधनाच्या दरात वाढ करत सामान्य जनतेची लूट चालवलेली आहे. केंद्रातील भाजप सरकारने कोरोनाच्या महामारी असताना लॉकडाऊनच्या काळात तब्बल २० ते २२ वेळा इंधनामध्ये दरवाढ केलेली आहे. तसेच सरकारने २०१४ पासून पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केलेली आहे.केंद्र इंधन दरवाढीच्याखाली जनतेला महागाईच्या खाईत लोटत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी निवेदनात देण्यात आला आहे.मालेगावी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनमालेगाव : तालुका राष्ट्रवादी पक्षातर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सर्व जगात कच्च्या इंधनाचे भाव कमी होत असताना भाजप सरकार दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करत आहे.भाजप सरकारने त्वरित पेट्रोल व डिझेलची भाव वाढ आटोक्यात आणावी व महागाई कमी करावी. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, विजय पवार, दिनेश ठाकरे, सलीम रिझवी, विनोद चव्हाण, राजेंद्र पवार, धनंजय पाटील, डॉ.धिरेन्द्र चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Petrolपेट्रोलNCPराष्ट्रवादी काँग्रेस