शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावला लांब पल्ल्याच्या बसेस स्थानकात आणण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:52 IST

पिंपळगाव बसवंत : येथे थांबा असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने स्थानकात आणण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने पिंपळगाव बसआगार व्यवस्थापक विजय निकम यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, परिवहन मंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी आणि मुंबई परिवहन कार्यालयाला स्पीडपोस्टद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत हे शहर खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ

पिंपळगाव बसवंत : येथे थांबा असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने स्थानकात आणण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने पिंपळगाव बसआगार व्यवस्थापक विजय निकम यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, परिवहन मंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी आणि मुंबई परिवहन कार्यालयाला स्पीडपोस्टद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.व्यापारी शहर आणि मिनी दुबई म्हणून ओळख असलेले पिंपळगाव बसवंत हे शहर खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शहरात व्यापारी, कामगार, नोकरदार, विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे पिंपळगावहून नाशिककडे व नाशिकहून पिंपळगावकडे तसेच मालेगाव, सटाणा, धुळे, नंदुरबार, नवापूर, शहादा, इंदोर, शिरपूर, पुणे, मुंबई, कल्याण, कसारा याठिकाणचे प्रवासी मोठ्या प्रमाणात पिंपळगावला ये-जा करीत असतात. मात्र, काही बसचालकांमुळे सर्रास बस बसस्थानकात न नेता उड्डाणपुलावरून बायपास नेल्या जातात. परिणामी येथील व बाहेरील प्रवाशांचे मोठे हाल होत असून तत्काळ हा थांबा असलेल्या बसेस स्थानकात येण्याच्या सूचना कराव्यात आणि जे चालक-वाहक आपल्या कर्तव्यात कसूर करून पिंपळगाव बसस्थानकात बस न आणता बायपास घेऊन जातील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी परिपत्रक काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.याप्रसंगी मनसेचे नाशिक जिल्हा संघटक संजय मोरे, पिंपळगाव शहर अध्यक्ष राजेंद्र भवर, पिंपळगाव उपशहर अध्यक्ष निलेश सोनवणे, सरचिटणीस एन. के. सोनवणे, सतीश पाटील, विकास कुर्धने, महेश कोपरे आदींसह मनसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Bus DriverबसचालकTravel Tipsट्रॅव्हल टिप्स