सातपूर : कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्रीराम चौकात रहदारी आणि वाढते अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. श्रीराम चौकाजवळ गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाणे आणि महापालिकेला तिमया स्वामी, यशवंत रणदिवे, प्रकाश सांबरे, मनोहर करनकाळ, भानुदास भांबरे, आदिंनी निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)
श्रीराम चौकात गतिरोधकाची मागणी
By admin | Updated: October 16, 2015 21:35 IST