शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार साहित्यातील कलाकृतीला मागणी

By admin | Updated: February 19, 2017 01:07 IST

खरेदीसाठी गर्दी : झेंडे, मफलर, टोप्या वैविध्यपूर्ण साहित्याला पसंती

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विविध पक्षांच्या नेत्यांकडून तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांविरोधात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी सर्वपक्षीय उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते शहरातील निवडणूक प्रचार साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये एकत्र खरेदी करताना दिसतात. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या नऊ दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे विविध प्रचार साहित्यांच्या दुकानांमध्ये प्रचार साहित्य खरेदी करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.  शहरातील प्रचार साहित्याच्या विविध दुकानांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचार साहित्याची शेजारी शेजारी मांडणी करण्यात आली आहे. प्रचार साहित्याची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना एका दृष्टिक्षेपात कोणत्या गोष्टी घ्यावयाच्या आहेत हे ध्यानात येते. प्रचार साहित्याची मागणी नोंदविणाऱ्या पक्षात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांसह रिपाइं, सपा व अपक्ष उमेदवारांनीही प्रचार साहित्य खरेदीसाठी जोर धरला आहे. राज्यातील प्रमुख पक्षांचे झेंडे, पक्षांची उपरणी, नेत्यांच्या प्रतिमा असलेली पदके, कापडी आणि मलमली बॅनर अशा साहित्याचा यात समावेश असून उमेदवारांसाठी तसेच कार्यकर्त्यांसाठी फेटे, त्याच्या जोडीला शाही मलमली उपरणे असा संच एकत्रितपणे उपलब्ध आहे. पक्ष कोणताही असो, त्या पक्षाच्या झेंड्यापासून ते अगदी पक्षाचे चिन्ह असलेल्या शर्टच्या बटणापर्यंत प्रचाराचे सर्व साहित्य शहरातील विविध दुकानांमध्ये उपलब्ध आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांना पक्षाकडून प्रचार साहित्य पुरविले जाते. परंतु पक्षाकडून मिळणारे साहित्य कार्यकर्त्यांना पुरेसे नसते. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळ्या आकाराचे आणि आकर्षक प्रचार साहित्याचे वाटप करीत असल्याने आपण मागे पडायला नको म्हणून निवडणुकीच्या रिंगनात उतरलेल्या सर्वच पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांकडून प्रचार साहित्याच्या खरेदीला गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)प्रचार साहित्यात निवडणुकीत मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या इव्हीएमच्या प्रतिकृतीचीही खरेदी करण्यात येत आहे. या मतदान यंत्राच्या प्रतिकृतीच्या साह्याने मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीसह उमेदवाराला मतदान कशाप्रकारे करावयाचे याचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात येते. त्यामुळे प्रचार साहित्यात अशा ईव्हीएम प्रतिकृतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुमारे पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत या यंत्राची एक प्रतिकृती मिळत असली तरी उमेदवार आवर्जून अशा प्रतिकृती खरेदी करीत आहेत. त्याचप्रमाणे साडीच्या काठावरील ‘पक्षचिन्ह’, ‘पक्ष चिन्हाची की-चेन’, फुगे, विविध पक्षांच्या झेंड्यांच्या रंगांची किनार आणि नेत्यांची छबी असलेले फेटे वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे, पदक (बिल्ले), विविध प्रकारची उपरणी, कापडी आणि मलमली बॅनर या साहित्यालाही मागणी वाढू लागली आहे.