हरसूल : परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. महाविद्यालयीन वेळेत कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेऊन रोडरोमिओंवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ कार्यवाही न केल्यास रोडरोमिओंना शिवसेना स्टाइलने धडा शिकविला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर अशोक गुंबाडे, भरत खोटरे, मिथून राऊत, जनार्दन पारधी, काशीनाथ वळवी, हरसूलचे उपसरपंच दत्तात्रय व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल भोये, लक्ष्मण मेघेल आसिफ सय्यद, प्रमोद कोथमिरे, नितीन शेंड, बापू बागुल, त्र्यबंक शिंदे, प्रदीप गांगुर्डे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.