शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जावेद अख्तर यांच्यावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:29 IST

नाराजीचा सूर : राजपूत करणी सेनेचे निवेदन

ठळक मुद्देहिंदू धर्मातील घुंगट परिधान करणा-या स्त्रिया वेळोवेळी आपल्या ओळखीसाठी, कायदेशीर कारवाईसाठी घुंगट बाजूला ठेवून जगास सामोरे जात असतात, असेही निवेदनात म्हटले आहे.

येवला : सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, अशी मागणी केल्याने या विधानावर येवल्यातील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, भाजप व सेनेच्या वतीने आक्षेप घेत नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला धार्मिक वळण देत जावेद अख्तर यांनी देशाचा आणि धर्माचा अपमान केला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येवला शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी स्वीकारले. आजपर्यंत हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये घुंगट परिधान करणाऱ्या महिलांनी कोणत्याही देशिवरोधी कारवाईमध्ये, कटकारस्थानात भाग घेतल्याचे दाखवून द्यावे आणि मग असेविधान करावे. हिंदू धर्मातील घुंगट परिधान करणा-या स्त्रिया वेळोवेळी आपल्या ओळखीसाठी, कायदेशीर कारवाईसाठी घुंगट बाजूला ठेवून जगास सामोरे जात असतात, असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कोषाध्यक्ष धिरजसिंग परदेशी, नाशिक जिल्हा अध्यक्ष झुंजारराव देशमुख, तालुका अध्यक्ष किरणसिंग परदेशी, उपतालुका अध्यक्ष शुक्लेश्वर जाधव, युवा ग्रामीण महामंत्री कुणाल परदेशी, छावा उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे, उपाध्यक्ष दिनेश परदेशी, शांताराम परदेशी, मयुर राठोड, विनायक राठोड, उमेश राठोड या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक