शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी

By admin | Updated: May 30, 2016 23:15 IST

दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी

दिंडोरी : तालुक्यातील ओझे येथील महिलेच्या संततीनियमन शस्त्रक्रिये दरम्यान झालेल्या मृत्यूची निष्पक्ष व सखोल चौकशी होऊन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मयत महिलेचे पती सुनील धुळे यांनी केली असून, सदर प्रकरणी त्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, मयत विवाहितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पंधरा दिवसाच्या चिमुरडीसह तीन बालके आईविना पोरकी झाली आहेत .दि. २५ मे रोजी संततीनियमन शस्त्रक्रियेसाठी ओझे येथील सोनाली सुनील धुळे हिला निगडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. गुरुवार, दि. २६ रोजी दुपारी शस्त्रक्रिया करताना गर्भपेशीच्या नसेऐवजी दुसरीच नस कापली गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचा आरोप तिच्या पतीने पोलिसांना दिलेल्या लेखी अर्जाद्वारे केला आहे. यावेळी डॉक्टरांनी तिला रक्ताची गाठ असल्याने नाशिकला न्यावे लागणार असल्याचे सांगितले. यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. तेथे तिची सोनोग्राफी केली असता डॉक्टरांनी गाठ नसल्याचे सांगत शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितल्यावर शस्त्रक्रि या केल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले. यावेळी तिला रक्त देण्यात आले. मात्र तिची तब्बेत अजून ढासळत तिचा शनिवार, दि. २८ रोजी सकाळी मृत्यू झाला. यानंतर तिच्या नातेवाइकांनी तिच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी करणारा तक्रार अर्ज दिंडोरी पोलीस ठाण्यात दिला होता. रविवारी सकाळी पुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात सुनील धुळे यांनी सदर शस्त्रक्रिया करणारे डॉ. निकम तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉ. लहाडे यांच्यासह निगडोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा सोनालीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे सांगत सदर प्रकाराची चौकशी करून त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.