शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवत स्वखर्चाने कॉँक्रीटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 15:51 IST

कानडे मारुती लेन : रहिवासी व व्यावसायिकांचा पुढाकार

ठळक मुद्देगावठाण परिसरात पार्किंग, वाहतूक कोंडी व त्यातुन होणारे वाद ह्या बाबी नित्याच्याचरहिवासी व व्यापारी यांनी एकत्र येत कानडे मारूती लेनमधील ७ इमारतींचे १२ फुट नव्हे तर जवळपास ३ बाय ६० मीटर इतक्या जागेवरील वाढीव बांधकाम स्वेच्छेने काढून घेतले

नाशिक - महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात असतानाच कानडे मारुती लेन येथील रहिवासी व व्यापारी यांनी सामासिक अंतरात केलेले वाढीव बांधकाम स्वत:हून काढून घेत स्वखर्चातून रस्त्याचे कॉँक्रीटीकरण केले. रहिवासी व व्यावसायिकांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत होत असून त्यामुळे कानडे मारुती लेनमधील वाहतुक कोंडी सुटण्यासही मदत झाली आहे.जुने नाशिक म्हणजेच गावठाण परिसरात पार्किंग, वाहतूक कोंडी व त्यातुन होणारे वाद ह्या बाबी नित्याच्याच झालेल्या आहेत. कानडे मारु ती लेन ही अरुंद आहे. याठिकाणी रहिवासी व व्यापाऱ्यांनी इमारतीचे बांधकाम करताना वाढीव जागेत ओट्यांचेही बांधकाम केले होते. त्यामुळे, अगोदरच अरुंद असलेल्या गल्लीत वाहन कोंडी होण्याबरोबरच वाहनतळाचीही अडचण होत होती. महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई होण्यापूर्वी परिसरातील रहिवासी व व्यापारी यांनी एकत्र येत कानडे मारूती लेनमधील ७ इमारतींचे १२ फुट नव्हे तर जवळपास ३ बाय ६० मीटर इतक्या जागेवरील वाढीव बांधकाम स्वेच्छेने काढून घेतले शिवाय, स्वखर्चाने रस्त्याचे रुदीकरण व कॉंक्रिटीकरण करु न परिसरातील वाहनतळ व वाहनकोंडीचा प्रश्न पुर्णत: निकाली काढला. बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे बांधकाम करतांना वाढीव जागेत ओट्यांच्या स्वरु पात बांधकाम केलेले होते . ही बाब मिळकतधारकांच्या लक्षात आल्यावर परिसरातील सर्व नागरिक व व्यापारी यांनी एकत्र येत सामंजस्याने आपापल्या इमारतींसमोरील वाढीव बांधकाम काढुन घेतले. सदर बांधकाम स्वत:हून काढून घेण्यासाठी अ‍ॅड. अक्षय कलंत्री , विनोद पोफळे , विवेक कुलकर्णी, अतुल मानकर , विलास देवकर, अतुल लोहिते, सतीष धात्रक, चिमन साधवानी, अनिश लालवानी यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण