शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अंदाजपत्रकाला विलंब, स्थायी समितीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 16:09 IST

सभापतींकडून नाराजी : प्रशासनाच्या कारभारावर टीका

ठळक मुद्देस्थायी समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपली तरी आयुक्तांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर का झाले नाही, असा सवालमुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी येत्या ६ ते ७ मार्चला अंदाजपत्रक स्थायीला सादर केले जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश देऊनही अद्याप ते सादर न झाल्याने सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला.महापालिका स्थायी समितीची सभा सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सभापती गांगुर्डे यांनी स्थायी समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपली तरी आयुक्तांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर का झाले नाही, असा सवाल मुख्य लेखाधिका-यांना केला. गांगुर्डे म्हणाले, स्थायी समितीने यंदा अभ्यास करण्यासाठी अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वीच सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, स्थायीच्या आदेशाला काहीच किंमत दिली गेली नसल्याबद्दल त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी नूतन आयुक्तांनी पदभार स्वीकारल्याने त्यांना अंदाजपत्रकात काही सुधारणा करायच्या आहेत त्यामुळे अंदाजपत्रकाला उशीर झाल्याचे सांगितले, तर मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी येत्या ६ ते ७ मार्चला अंदाजपत्रक स्थायीला सादर केले जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु, या उत्तराने समाधान न झालेल्या सभापतींनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. प्रशासनाने चांगला पायंडा पाडण्याच्या कामात खोडा घातल्याचा आरोपही सभापती गांगुर्डे यांनी केला.मागच्याच आयुक्तांचे अंदाजपत्रक का नाही?सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी मुख्य लेखाधिका-यांना अंदाजपत्रक कधीपर्यंत सादर करायचे असते आणि त्याचे नियम काय आहेत, याची विचारणा केली. परंतु भोर यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. यावेळी सभापतींनी मागच्याच आयुक्तांचे अंदाजपत्रक सादर करून नवीन आयुक्तांना पुरवणी दाखल करून त्यांच्या संकल्पना मांडता आल्या असत्या, असे सांगत विलंब झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प