शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:02 IST

गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती.

नाशिक : गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. अशा परिस्थितीत पडलेली झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराकडे असलेले मनुष्यबळ इतर आपत्कालीन कामांमध्ये अडकून पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर तासन्तास झाडे तशीच पडून होती.पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली तसेच धोकादायक स्थितीतील झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रविवारी शहर परिसरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे साहजिकच ठेकेदाराच्या यंत्रणेकडूनच रस्त्यावर आडवी पडलेली झाडे तोडण्यासाठी लाकूडतोड्यांची मदत घ्यावी लागते. मात्र शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे ठेकेदाराकडील लाकूड तोडणारी माणसे कामात अडकली असल्यामुळे शहराती काही भागांत पोहचण्यात काहीसा विलंब झाल्याने तासंतास झाडे पडून होती. त्यामुळे अशा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. उपनगर येथील म्हसोबा मंदिरासमोर पडलेल्या झाडामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. परंतु जोपर्यंत कर्मचारी झाड तोडण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत वाट पाहाण्याशिवाय पर्याय नव्हता. ठेकेदाराकडील लाकूड तोडणारी माणसे जुने नाशिकमधील आपत्कालीन कामात अडकल्याने झाड बाजूला करण्यास विलंब झाल्याचे नगरसेविका सुषमा पगारे यांनी सांगितले. दोन तासांनंतर रस्ता मोकळा करण्यात आला.देवळालीगाव मालधक्का रोड येथेही एका टपरीवर झाड पडल्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अर्ध्यातासात अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले मात्र झाड तोडून बाजूला करणे गरजेचे असल्याने लाकूड तोडणारे कामगार उपलब्ध झाले नसल्याने सोमवारी सकाळपर्यंतही झाड तसेच पडून असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.दिवसभर कामे सुरूरविवारी शहरातील अनेक भागांत झाडे उन्मळून पडली असली तरी दिवसभर सुरू असलेला पाऊस आणि रात्र झाल्यामुळे अनेक ठिकाणची कामे होऊ शकली नसली तरी सोमवारी सकाळपासून मात्र लाकूड तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर कामे सुरू करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी सकाळपासूनच कामाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक मार्ग मोकळे होऊ शकले तर धोकादायक स्थितीत संरक्षक भिंतींवर तसेच टपºयांवर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसTrafficवाहतूक कोंडी