शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकाला विलंब, स्थायी समितीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:39 IST

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश देऊनही अद्याप ते सादर न झाल्याने सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला.

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश देऊनही अद्याप ते सादर न झाल्याने सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. महापालिका स्थायी समितीची सभा सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सभापती गांगुर्डे यांनी स्थायी समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपली तरी आयुक्तांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर का झाले नाही, असा सवाल मुख्य लेखाधिकाºयांना केला. गांगुर्डे म्हणाले, स्थायी समितीने यंदा अभ्यास करण्यासाठी अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वीच सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, स्थायीच्या आदेशाला काहीच किंमत दिली गेली नसल्याबद्दल त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी नूतन आयुक्तांनी पदभार स्वीकारल्याने त्यांना अंदाजपत्रकात काही सुधारणा करायच्या आहेत त्यामुळे अंदाजपत्रकाला उशीर झाल्याचे सांगितले, तर मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी येत्या ६ ते ७ मार्चला अंदाजपत्रक स्थायीला सादर केले जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु, या उत्तराने समाधान न झालेल्या सभापतींनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. प्रशासनाने चांगला पायंडा पाडण्याच्या कामात खोडा घातल्याचा आरोपही सभापती गांगुर्डे यांनी केला.मागच्याच आयुक्तांचे अंदाजपत्रक का नाही ?सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी मुख्य लेखाधिकाºयांना अंदाजपत्रक कधीपर्यंत सादर करायचे असते आणि त्याचे नियम काय आहेत, याची विचारणा केली. परंतु भोर यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. यावेळी सभापतींनी मागच्याच आयुक्तांचे अंदाजपत्रक सादर करून नवीन आयुक्तांना पुरवणी दाखल करून त्यांच्या संकल्पना मांडता आल्या असत्या, असे सांगत विलंब झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका