शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना कचºयाचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 01:21 IST

सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनील बुकाणे आणि विभागीय अधिकारी डॉ. सोमनाथ वाडेकर यांना कचºयाचा हार घालत संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देसभागृहाची केली कचराकुंडी : घंटागाडी बंद, कचºयाचे ढीग साचल्याने नगरसेवक आक्रमक

सिडको : सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनील बुकाणे आणि विभागीय अधिकारी डॉ. सोमनाथ वाडेकर यांना कचºयाचा हार घालत संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे सभागृहात कचराफेक आंदोलन करूनअक्षरश: कचराकुंडी केली. येत्या सोमवारपर्यंत सिडकोतील घंटागाडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनपा आयुक्तांच्या दालनात ‘कचरा फेक’ आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी नगरसेवकांनी दिला.सिडको आणि सातपूर विभागांसाठी यापूर्वी जीटी पेस्ट कंट्रोल कंपनीचा ठेका होता. परंतु अनियमितता आणि कराराचा भंग होत असल्याचा ठपका ठेवून २४ डिसेंबर रोजी आयुक्तांनी हा ठेका रद्द केला आहे. त्यानंतर अन्य ठेकेदाराला कचरा संकलन करण्यास सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र जागोजागी कचºयाचे ढीग असून, पर्यायी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले आहेत. शुक्रवारी (दि.१४) प्रभाग समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. सभापती दीपक दातीर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१४) प्रभाग समितीची सभा झाली.स्वच्छतेचा बोजवारासिडको भागात घंटागाडीचा पूर्णत: बोजवारा उडाला असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाने घंटागाडीची ठेका रद्द करताना पर्यायी व्यवस्था केली नाही, असा आरोप असल्यामुळे सिडकोतील सर्वच नगरसेवक त्रस्त झालेअसून, त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात चारघंटागाड्या सुरू कराव्या. तसेच मनपाकडे असलेल्या घंटागाड्याया भंगारात न देता त्यातीलचांगल्या गाड्या सिडकोसाठी सुरू कराव्यात असे प्रशासनालानिवेदन दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको