शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शब्दसुरांच्या संगे रंगणार दीपावली, पाडवा मैफली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:26 IST

दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव या प्रकाश उत्सवानिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांची मैफल रंगणार आहे. पहाटेच्या गारव्यात आनंददायी शब्दसुरांचा हा उत्सव नाशिककरांसाठी आगळी पर्वणी ठरणार आहे.

नाशिक : दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव या प्रकाश उत्सवानिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांची मैफल रंगणार आहे. पहाटेच्या गारव्यात आनंददायी शब्दसुरांचा हा उत्सव नाशिककरांसाठी आगळी पर्वणी ठरणार आहे.सार्वजनिक उत्सव समिती व आदिशक्ती, स्त्रीशक्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ८) दीपावली पाडवा पहाट कार्यक्रम होणार असून, यात प्रसिद्धगायक मराठी गीते सादर करणार आहेत.  इंदिरानगर येथील समर्थ महिला मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. ८) पाडवा पहाट कार्यक्रमात पंडित प्रसाद दुसाने यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.लाडशाखीय वाणी मित्रमंडळ व लाडशाखीय वाणी समाज हितगुज महिला मंडळाच्या वतीने गुरुवारी पाडवा पहाटनिमित्त वाणी कलाकार संघटन प्रस्तृत ‘उधळीत शतकिरणा’ या सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बलिप्रतीपदाच्या दिवशी पाडवा पहाट होणार असून, यावेळी सर्वांनी मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सचिन बागड, शोभा कोतकर, सुनील मुसळे, विठ्ठल मोराणकर आदींनी केले आहे.  मंगलदीप प्रस्तुत दीपावली पाडवा पहाट कार्यक्रम गुरुवारी (दि. ८) आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी- जोगळेकर यांची गीत मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले आहे.  नसती उठाठेव मित्र परिवार यांच्या वतीने सूरमयी दीपावली पहाटचे बुधवारी (दि. ७) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायिका विदूषी अंजना नाथ गायन सादर करणार असून तबलासाथ अजिंक्य जोशी तर संवादिनीवर सुभाष दसककर हे साथ करणार आहेत.  श्रद्धा गोदा फाउंडेशनच्या वतीने यंदा गुरुवारी (दि. ८) सांज पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायिका सावनी रवींद्र, स्वप्नील गोडबोले, विश्वदा जाधव आदींचे गायन रंगणार आहे, अशी माहिती फाउंडेशचे अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांनी दिली.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिक