शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

हेरगिरीमुळे अटकेत असलेल्या दीपकचा जामीन नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:15 IST

व्हॉट्सॲपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली आणि या ओळखीतून दीपक हा पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला होता. त्याने अनोळखी महिलेच्या ...

व्हॉट्सॲपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली आणि या ओळखीतून दीपक हा पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला होता. त्याने अनोळखी महिलेच्या सांगण्यावरून थेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथील प्रतिबंधित क्षेत्राची व तेथे तयार केले जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या लढाऊ सुखोई विमानांची तसेच त्यांच्या अन्य संवेदनशील भागाची व इतर सुरक्षासंबंधित गोपनीय माहिती सोशल मीडियावरून महिलेला पुरविल्याची धक्कादायक बाब एटीएसच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आणली होती. दीपकला बेड्या ठोकल्यानंतर त्यास न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावली होती. यामुळे दीपकची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान, दीपकने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यात सरकारी पक्षातर्फे दहशतवादविरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात दीपकने पाकस्थित लोकांना संवेदनशील माहिती पुरवल्याबाबत न्यायालयात पुरावे सादर केले. त्यात दीपकने पाकिस्तानला पुरवलेली माहिती मिळवणे अतिशय अवघड असतानाही ती माहिती मिळवून पाकिस्तानला पाठवली. त्यामुळे देशाच्या सुरक्षाव्यवस्थेकरिता व संरक्षण खात्याच्या एचएएलसारख्या कारखान्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी असल्याचे मिसर न्यायालयात म्हणाले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत दीपकचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

---इन्फो--

चाैकशीत धक्कादायक माहिती

संशयित दीपककडे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या चौकशीतून अत्यंत गंभीर स्वरूपाची धक्कादायक माहिती समोर आली. एचएएलच्या भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती जी अत्यंत संवेदनशील आहे, ती पाकच्या गुप्तहेर संस्थेच्या हस्तकांपर्यंत पोहचविली.

तसेच भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानातील मिसाइल व रॉकेटलाँचरबाबत तांत्रिक माहितीही उघड केल्याचे समोर येत आहे. तपासात काही संशयास्पद व्यक्तींचे फोन क्रमांक निष्पन्न झाले असून, याबाबत सविस्तर माहिती तपासी यंत्रणेकडून घेतली जात आहे.