मुखेड : येथील शेतकरी दिपक एकनाथ वझरे यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळुन त्यांच्या निवासस्थानी छताला फेटा बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या केलेल्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कोणीही नव्हते. यावेळी त्यांची पत्नी, मुलगा, सुन, नातू शेतातील वस्तीवर होते. दीपक वझरे यांना चार एकर शेतजमिन होती. त्यामधील त्यांनी दोन एकर शेतजमिनीची विक्र ी करून त्यातुन मिळालेल्या पैशातून सहकारी पतसंस्थेचे कर्ज फेडले. परंतु अजुनही त्यांचेकडे मुखेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज बाकी असून, हात उसनवारीे असे बरेच कर्ज दणे बाकी होते. याशिवाय त्यांना एकुलत्या एक मुलीच्या विवाहाचीही काळजी झोप येऊ देत नव्हती. मुलीच्या विवाहाच्या खर्चाचेही त्यांना मोठे टेन्शन होते. त्यांच्या पश्चात वयोवृध्द आई, पत्नी, विवाहित मुलगा, सुन, नातु, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. तांदळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिस पाटील सुरेश वाघ, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब गुंड, राऊसाहेब आहेर, चिंधु गुंड, हिरामण आहेर आदि उपस्थीत होते.
कर्जबाजारी पणाला कंटाळून दीपक वझरे यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 18:47 IST
मुखेड : येथील शेतकरी दिपक एकनाथ वझरे यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळुन त्यांच्या निवासस्थानी छताला फेटा बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.
कर्जबाजारी पणाला कंटाळून दीपक वझरे यांची आत्महत्या
ठळक मुद्देनिवासस्थानी छताला फेटा बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.