माळमाथा परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या झोडगे येथे अनेकांची राहण्यासाठी पसंती दिली जात असल्याने मुख्य गावांसह नववसाहतीची वाढती संख्या पाहता . येथील अमरधाम ते गावातील अंतर अधिक असल्याने अंत्यविधीसाठी अधिक लांबपर्यंत पायी चालत जावे लागते. गावकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन लोकवर्गणीतून ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वैकुंठरथ खरेदी करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी निधी संकलित केला. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुलाबराव देसले, उपाध्यक्ष इंदिराताई देशमुख, कार्याध्यक्ष शिवाजी देसाई सचिव विठ्ठल नेरकर, खजिनदार मधुकर देवरे , संघटक धर्माजी सोनवणे , आदींसह प्रतापराव देसाई, , कृष्णा देवरे , अभिमन सोनवणे, सुभाष देसले,सुभाष बोरसे अशोक न पगारे,शिवाजी दौलत देसले माजी अध्यक्ष भिकनराव देशमुख हिलाल राजमल देसले , विश्वासराव त्र्यंबक देसले आदी उपस्थित होते.
झोडगे येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST