शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्या कायम ठेवूनही रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 00:59 IST

एप्रिल महिन्यात कमालीचा पॉझिटिव्हिटी दर गाठलेल्या कोरोनाने अचानक वाढलेली रुग्णसंख्या व त्या प्रमाणात होत असलेले मृत्यू पाहता, सदरची लाट आटोक्यात येण्याबाबत व्यक्त होणाऱ्या शंकांना आता पूर्णविराम मिळण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. सरासरी दररोज १५ हजार संशयित रुग्णांची चाचणी केली असता त्यातून दोन ते अडीच हजार रुग्णच कोरोनाबाधित सापडू लागले आहेत.

ठळक मुद्देपॉझिटिव्हिटीमध्ये घसरण : दिवसाला जिल्ह्यात होतात सुमारे पंधरा हजार संशयितांच्या तपासण्या

नाशिक : एप्रिल महिन्यात कमालीचा पॉझिटिव्हिटी दर गाठलेल्या कोरोनाने अचानक वाढलेली रुग्णसंख्या व त्या प्रमाणात होत असलेले मृत्यू पाहता, सदरची लाट आटोक्यात येण्याबाबत व्यक्त होणाऱ्या शंकांना आता पूर्णविराम मिळण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. सरासरी दररोज १५ हजार संशयित रुग्णांची चाचणी केली असता त्यातून दोन ते अडीच हजार रुग्णच कोरोनाबाधित सापडू लागले आहेत.  दोन आठवड्यांपूर्वी हेच प्रमाण तीन ते साडेतीन हजारांच्या आसपास इतके होते.     शासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना व आरोग्य खात्याच्या प्रयत्नांबराेबरच शहरासह ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाविषयी दाखविलेल्या सजगतेमुळेच हे शक्य झाले असून, त्यातही जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या पातळीवर गावोगावी राबविलेल्या मार्गदर्शक योजनांचा यात अधिक समावेश आहे. आजही कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरी, एप्रिल महिन्याच्या तुलनेत त्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे. पॉझिटिव्हिटीही झाली कमी १ मे रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के इतका होता. त्यात आरटीपीसीआरने करण्यात आलेल्या चाचणीचा १८.१७ तर रॅपिड अँटिजन चाचणीचा २५.४९ इतका होता. मात्र १३ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर घसरून १५.८२ वर येऊन स्थिरावला आहे. त्यातही नाशिक महापालिका हद्दीत कारोनाबाधितांचे प्रमाण ११ टक्के तर ग्रामीण भागात २५ टक्के इतके आहे.नाशिक शहरापेक्षा मालेगावी चाचण्या कमी१ ते १३ मे यादरम्यान कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून, संशयितांच्या चाचण्यांची संख्या मात्र कायम आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने दररोज साधारणत: साडेआठ ते नऊ हजार तर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात दररोज पाच ते साडेपाच हजार नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यामानाने मालेगाव महापालिकेत बोटावर मोजण्याइतपत दोन आकडी संख्येतच चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचण्यांमध्ये १ मे रोजी एकूण १३,८६८ लोकांच्या चाचणीमागे ३,४१२ बाधित रुग्ण सापडले होते.१२ लाख चाचणीवर्षभरात   ३० एप्रिल अखेर जिल्ह्यात एकूण १२ लाख १२ हजार ३०६ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ३ लाख २७ हजार ३७६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचा दर २७ टक्के इतका होता. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या