शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 14:40 IST

मनोज बागुल, वटारबागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाली आहे.सध्या परिसरात तपमानात मोठी वाढ ...

मनोज बागुल, वटारबागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात कांदा काढनीच्या कामांना वेग आला असून रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाच लाल सोन काढण्यासाठी उन्हाच्या झळ अंगावर सोसताना परिसरात दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाली आहे.सध्या परिसरात तपमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाचा पारा चाळिशीच्या आसपास गेल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.कडक उन्हाच्या झळा अंगावर लाही-लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीच्या कामे चालू आहेत. रणरणत्या उन्हाचा चटका गेला दहा-बरा दिवसापासून चांगलाच जाणवत असून,रात्रीच्या वेळेस थंडी,दिवसा कडक उन्हाचा चटका या वातावरणातील उकाडा चांगलाच जाणवत आहे. वटार, डोंगरेज, चौंधाणे, कंधाने, विंचुरे आदी गावांच्या परिसरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरु असून,चालू वर्षी नदी, नाले, विहिरी, कुपनलिका यांनी पाणी बर्यापैकी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांद्याचे लागवड क्षेत्रात वाढ झाली होती तसेच चालू वर्षी कांद्यासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.एकीकडे नागरिकांना उन्हामुळे घराच्या बाहेर न निघण्याचे सागितले जातेय तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग उन्हाच्या झळा अंगावार सोसत कष्ट करताना दिसतोय. दुपारच्या वेळेस कडक उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत असून,तापलेली जमीन व त्यातून निघणार्या तप्त झळा शेतात काम करणार्या महिला व पुरु षाच्या अंगावर चांगलेच चटके देऊन जात आहेत.काढणीस आलेले कांदा पिक उन्हाच्या चटकक्याने भाजू न्हाये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्यापाचटाचा वापर करीत असताना दिसत आहेत तर काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेचच चाळीत भरण्यावर शेतकर्यांनी भर दिल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाच्या चटक्याने शेतातील पिके हि पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहेत,दिवसभर काम करताना स्वसंरक्षणासाठी अंग झाकून घ्यावे लागत आहे.म्हणून संरक्षणासाठी मजूर वर्ग टोप्या उपरण्याचा वापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादक घेतले जाते.व कांदा हे पिक शेतकर्याच्या अर्थकारणात महतवाची भूमिका बजावणारे पिक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकर्यांची आर्थिक गणतिे अवलबून असतात.कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते कांदा लागवड,खुरपणी, औषध फवारणी,काढणी ,भरणी आदीपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची भांडवली गुंतवणूक होते.त्यातच समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही तर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली.कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्याकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक