शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:14 IST

घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देसाधारणत: तीन महिन्यात हे पीक येते तसेच या पिकाला पाण्याची अधिक गरज असते.मात्र पावसाच्या भरवशावर लावलेल्या या भाताला पावसाने दगा दिल्याने ही पिके वाचविण्यासाठी शेतकº्यांची केविलवाणी धडपड तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाº्या इगतपुरी तालुक्याच्या काही भागात आरंभीच्या काळात समाधानकारक पाऊस झाला या पावसामुळे तालुक्याच्या धरणसाठ्यात अल्पावधीतच लक्षणीय वाढ होऊन धरणे भरली मात्र नंतरच्या काळात पावसाने सातत्याने ओढ दिली.यामुळे ऐन पिकावर पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने उन्हाच्या तिव्रतेमुळे हातातोंडाशी आलेले भाताचे पीक शेतकº्यांच्या डोळ्यादेखत जळून जात आहे.दरम्यान पावसाने ओढ दिल्याने भाताच्या उत्पन्नांत प्रचंड घट झाल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी दिवाळी पूर्वीच आर्थिक संकटात सापडला आहे.पिके वाचिवण्यासाठी केविलवाणी धडपडदरम्यान तालुक्यात सर्वाधिक गरी जातीचे भाताची लागवड केली जाते.हे पीक उत्पनास अधिक असल्याने ही पिके घेण्याकडे शेतकऱ्याचा कल अधिक आहे.या पिकांना जगविण्यासाठी शेतकºयांच्या सर्व कुटुंबाला रात्रीचा दिवस करून जवळच्या नदी,नाले,बंधारा,धरण आणि विहिरीतून पाणी दयावे लागत आहे.पावसाच्या आकडेवारीत फरकदरम्यान इगतपुरी तालुक्यात सहा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र असल्याने सहा ही ठिकाणी पावसाच्या आकडेवारीत तफावत असते.तालुक्याच्या घाट माथ्यावर असणाº्या इगतपुरी शहर परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो तर पूर्व भागात पावसाची आकडेवारी निम्म्याहून कमी असते.असे असताना शहरातील आकडेवारी शासन गेली अनेक वर्षांपासून गृहीत धरीत असल्याने तालुक्यात दुष्काळ जाहीर होत नसे.यावर्षीपासून पावसाची सरासरी काढल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.पंचनामे करण्याची मागणीदरम्यान तालुक्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने भात पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शासनाने या पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकº्यांना भरपाई दयावी अशी मागणी तालुक्यातील शेतकº्यांनी केली आहे.