शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

वीजनिर्मितीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:17 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाउन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढून २० हजार मेगावॉटपर्यंत जाते, मात्र सध्या विजेची मागणी १३ हजार मेगावॉटपर्यंत आलेली आहे. ती अजूनही घटण्याची शक्यता आहे. अर्थात, लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय तर बंद झालेच; परंतु राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्यानेदेखील घरगुती विजेची मागणीही कमी झाली आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : लॉकडाउनबरोबरच अवकाळी पावसाचाही परिणाम

शरदचंद्र खैरनार।एकलहरे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाउन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढून २० हजार मेगावॉटपर्यंत जाते, मात्र सध्या विजेची मागणी १३ हजार मेगावॉटपर्यंत आलेली आहे. ती अजूनही घटण्याची शक्यता आहे. अर्थात, लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय तर बंद झालेच; परंतु राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्यानेदेखील घरगुती विजेची मागणीही कमी झाली आहे.सद्यस्थितीत महानिर्मितीचे नाशिक, परळी, भुसावळ व खापरखेडा येथील २१० मेगावॉटचे संच विजेच्या मागणीअभावी बंद ठेवण्यात आले आहेत. इतर ठिकाणची वीज निर्मिती कमी- अधिक प्रमाणात सुरू आहे. एकलहरे येथील प्रत्येकी २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी एकाचा कोळसा खासगी कंपनीस दिला आहे. एक संच स्टँडबाय असून, एका संचातून १५० मेगावॉटच्या जवळपास वीज उत्पादन दोन दिवसांपूर्वी सुरू होते. मात्र महावितरणची मागणी घटल्याने तो संचही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागणी वाढल्यावर संच त्वरित सुरू करण्यात येईल, असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी लोकमतला सांगितले.गरज भासलीच तर हा तुटवडा केंद्र शासनाच्या वाट्यातून म्हणजेच सेंटर ग्रीडमधून मिळणाऱ्या विजेतून भागवलो जातो, परंत तूर्तास विजेची मागणी घटली आहे.राज्याची मागणी १५ हजार ७४३ मेगावॉटदिनांक २६ मार्चच्या सायंकाळी ५ वाजेच्या आकडेवारीनुसार कोल, गॅस, हायड्रो व सोलर मिळून महाजेनकोची वीजनिर्मिती ५ हजार ४२३ मेगावॉट आहे. तर खासगी क्षेत्रातील विविध कंपन्यांची तसेच इतरांची एकूण ४ हजार १३३ मेगावॉट वीजनिर्मिती अशी एकूण (मुंबईवगळता) ९ हजार ५५६ मेगावॉट वीज राज्यात उपलब्ध होत आहे. महानिर्मितीसह खासगी व इतर स्रोतांची मिळून १० हजार ७२६ मेगावॉट वीज आहे. त्या तुलनेत राज्याची मागणी १५ हजार ७४३ मेगावॉट आहे. राज्याची मागणी लक्षात घेता सुमारे पाच हजार मेगावॉट विजेचा तुटवडा भासतो.वीजनिर्मितीची स्थितीएकलहरे (नाशिक)- क्षमता ६३० मेगावॉट, वीजनिर्मिती- शून्यकोराडी- क्षमता २४०० मेगावॉट, वीजनिर्मिती- १२७२खापरखेडा- क्षमता १३४० मेगावॉट, निर्मिती ४७६,पारस- क्षमता ५०० मेगावॉट, निर्मिती- ४६१,परळी- क्षमता ११७० मेगावॉट, निर्मिती- शून्य,चंद्रपूर- क्षमता २९२० मेगावॉट, निर्मिती- १६००,भुसावळ- क्षमता १२१९ मेगावॉट, निर्मिती- शून्य,उरण गॅस टर्बाईन- क्षमता ४३२ मेगावॉॅट, निर्मिती- २५५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरण