शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By admin | Updated: November 28, 2014 00:11 IST

कामगार मृत्यू प्रकरण : कुटुंबीयांसह कंत्राटी कामगारांचे सहा तास तीव्र आंदोलन

नाशिक : गटारीच्या चेंबर दुरुस्तीचे काम करताना विषारी गॅसने गुदमरून मरण पावलेल्या तीन कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व ठेकेदाराच्या अटकेची मागणी करीत, कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबीय तसेच कंत्राटी कामगारांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत जिल्हा रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन करीत रास्ता रोको केला. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व पोलीसांनी बहुविध प्रयत्न करूनही आंदोलक दाद देत नसल्याने अखेर लिखित आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगापूररोडवरील सोमेश्वर परिसरात चेंबर दुरुस्तीसाठी गेलेल्या तीन कंत्राटी कामगारांचा बुधवारी दुपारी गुदमरून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ यामध्ये हिरामण जानू माढे, गोपीनाथ धोंडीबा मोरे व प्रशांत चिंधू चौधरी यांचा मृत्यू झाला होता़ गुरूवारी सकाळी या तिघांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली, यावेळी सकाळी ९ पासून रुग्णालयाबाहेर त्यांचे नातेवाईक, कंत्राटी कामगार तसेच सीटूसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करावी, कायमस्वरूपी नोकरी द्यावी तसेच इतर मागण्या करून गोंधळ घातला. या मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने जिल्हा रूग्णालयात तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी महापालिका व पोलिसांविरोधात घोषणा सुरू केल्या त्यामुळे पोलिसांनी तातडीने महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, उपआयुक्त पगारे यांना गळ घालून आंदोलकांची समजूत काढावी अशी विनंती केल्याने महापौर मुर्तड यांनी रूग्णालयात धाव घेवून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. परंतु लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतल्यावर महापौर व उपमहापौरांना काढता पाय घ्यावा लागला़ त्यानंतर आंदोलकांनी थेट त्र्यंबकरोडवर धाव घेवून दोन्ही बाजुचा रस्ता रोकला. परिणामी भर वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यावर पोलिसांची धावपळ उडाली. सुमारे तास भर त्यांनी ठिय्या दिला.अखेरीस महापालिका आयुक्तांशी चर्चा करून महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक संजय साबळे, तानाजी जायभावे, महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त विजय पगार, आनंद सोनवणे यांनी लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना वाचून दाखवले़ त्यामध्ये शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत करण्यात येईल, विशेष बाब म्हणून या कामगारांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात येईल व कंत्राटदाराकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, अशी आश्वासने देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेत अखेर मृतदेह ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)