शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मागणी घटल्याने वीजनिर्मितीत कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 01:28 IST

राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती संचातून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन सुरू आहे, तर परळी येथील वीज उत्पादन शून्यावर आले आहे. उरण येथे गॅसपुरवठ्याअभावी संच बंद आहेत.

शरदचंद्र खैरनार/ एकलहरे : राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती संचातून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन सुरू आहे, तर परळी येथील वीज उत्पादन शून्यावर आले आहे. उरण येथे गॅसपुरवठ्याअभावी संच बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची निकड, ऑक्सिजन प्लांटची उभारणी, त्यासाठी अखंडितपणे वीजपुरवठा करणे गरजेचे होते. उन्हाच्या वाढत्या उकाड्याने विजेचा घरगुती व कार्यालयांतील वापर, शेतीच्या खरीप हंगामाच्या कामांची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती विजेचा वापर वाढल्याने गेल्या पंधरवड्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॉटपर्यंत गेली होती. मात्र सद्याचे पावसाळी वातावरण, काही प्रमाणात लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग, घरगुती व शेतीसाठी लागणाऱ्या विजेची मागणी कमी होऊन १६ हजार मेगावॉटपर्यंत येऊन ठेपली आहे. त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला आहे. दुसरीकडे पाण्याच्या पुरेशा साठ्याने जलविद्युत केंद्रांचा सपोर्ट मिळाल्याने औष्णिकची वीजनिर्मिती कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी झिरो शेड्युल, कोळशाची समस्या, वार्षिक देखभाल दुरुस्ती या कारणांमुळे काही संच बंद ठेवावे लागत आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून मंगळवारी दुपारपर्यंत विजेची निर्मिती घटली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज