शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील साठ्यांमध्ये घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:26 IST

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस फक्त १० टक्केच पाणी धरणांमध्ये शिल्लक होते.

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस फक्त १० टक्केच पाणी धरणांमध्ये शिल्लक होते.नाशिक जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता ६५,५१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहिली होती. त्यामुळे आॅक्टोबरअखेर काही धरणांचे दरवाजे उघडून देत पाण्याचा विसर्ग करावा लागला. परिणामी नदी, नाल्यांना महापुराची परिस्थिती निर्माण झाली तर विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यांपर्यंत पावसाची हजेरी कायम राहिल्याने जमिनीखालच्या पाणीपातळीत वाढ झाली.त्यामुळे यंदा दरवर्षापेक्षा उशिराने जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तथापि, धरणांमध्ये पाणी भरपूर असले तरी, धरणाच्या पाण्यावर असलेले इतर आरक्षणाचा विचार करता यंदा मे महिन्यात फक्त ३४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. हवामान खात्याने यंदाही पाऊस समाधानकारण पडणार असल्याचे भाकित केले, परंतु पाऊस काहीसा लांबणीवर पडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.--------गंगापूर धरणात ४७ टक्के पाणीनाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ३८ टक्के जलसाठा असून, गंगापूर धरणात ४७ टक्केपाणी आहे. सध्या कश्यपी व गौतमी गोदावरीतून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणात ६६ टक्के जलसाठा आहे, तर ओझरखेडमध्ये ४१, पालखेड १६, भावली २०, वालदेवी २२, चणकापूर २७, हरणबारी ३३, गिरणा ३४ टक्केअशाप्रकारे प्रमुख धरणांमध्ये पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी मात्र याचवेळी जिल्ह्यातील दहा धरणांनी तळ गाठला होता. यंदा मात्र अद्याप तशी वेळ आलेली नाही.

टॅग्स :Nashikनाशिक