शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कळवणमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:02 IST

कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या पीकरोपांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना साकडे : पावसाअभावी पिके करपल्याने बळीराजा चिंतित

कळवण : कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व शेजारील तालुक्यांमध्ये मुख्यत: भात व नागली, वरई ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ती संकटात आली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आदिवासी शेतकऱ्यांच्या पीकरोपांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना पावसाने पाठ फिरवली, पावसाअभावी पिके करपू लागली असून, शासनस्तरावरून पंचनामे करण्याची मागणी होत आहे.विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, हिरामण खोसकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार पवारांनी कळवण, सुरगाणा तालुक्यातील दुष्काळसदृश स्थितीमुळे आदिवासी बांधवांचे आर्थिक गणित कोलमडल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह कळवण, सुरगाणा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या फैलावामुळे देशासह महाराष्ट्र राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संचारबंदीमुळे व पावसाने पाठ फिरविल्याने सुरगाणा तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सुरगाणा तालुक्यातील मुख्य पीक भात असून, ते पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाअभावी भात शेतीची लागवड २५ टक्केसुद्धा झालेली नाही अणि जी लागवड बाकी आहे ती रोपे जवळपास ९० दिवसांच्या वर वाढ झाल्याने पाण्याअभावी करपू लागली आहेत. रब्बी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. कळवण व सुरगाणा मतदारसंघातील माळरानात डोंगरमाथ्यावर भुईमूग, वरई, नागली ही पिके घेतली जातात; मात्र अपुºया पावसामुळे पिके करपून उद्ध्वस्त झाली आहेत. काबाडकष्ट करणारा शेतकरी आधीच कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, लॉकडाऊनमुळे मोलमजुरीचे दरवाजेही बंद झाले आहे. त्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक कोंडीत सापडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी