शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाणीकपातीवर आज होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:23 IST

पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असून त्यावर शुक्रवारी (दि.१४) होणाऱ्या महासभेत फैसला होणार आहे. त्याचप्रमाणे कश्यपी प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य देखील ठरणार आहे.

ठळक मुद्देआॅनलाइन महासभा : कश्यपी प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य ठरणार

नाशिक : पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असून त्यावर शुक्रवारी (दि.१४) होणाऱ्या महासभेत फैसला होणार आहे. त्याचप्रमाणे कश्यपी प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य देखील ठरणार आहे.महापालिकेची मासिक महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आॅनलाईन पध्दतीने शुक्रवारी (दि.१४) होणार आहे. या महासभेत सर्वाधिक महत्वाचा विषय पाणी कपातीचा आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत गंगापूर धरणात ९१ टक्के जलसाठा होता. मात्र यंदा जेमतेम ६० टक्के आहे. तर धरण समुहात अवघ्या ४५ टक्के इतका साठा आहे. त्यामुळे शहरात भविष्यात पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी नियोजनाचा एक भाग म्हणून शहरात पाणी कपात करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ज्या भागात दोन वेळ पाणी पुरवठा केला जातो. त्या ठिकाणी एक वेळ तर ज्या भागात एक वेळ पाणी पुरवठा होतो, तेथे सुमारे वीस मिनीटे पाणी कपात करण्याची शिफारस आहे. अर्थात, यासंदर्भात महासभेतील चर्चेअंतीच महापौर निर्णय घेणार आहेत.२४ कश्यपी धरणग्रस्तांना मनपाच्या सेवेत घेण्याबाबत देखील महासभेत प्रशासनाने प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, मुळात शासन आकृतीबंधला मंजुरी देत नसून अशावेळी २४ रिक्त जागा या प्रकल्पग्रस्तांमधून भरल्यास सध्या महापालिकेत रोजंदारीवर काम करणाºया कामगारांची संधी हुकण्याची शक्यता आहे. या भीतीनेच त्यांचा विरोध सुरू आहे.अर्धा डझन अधिकारी मनपा सेवेतविविध शासकिय विभागातून महापालिकेत उपायुक्त, अतिरीक्त आयुक्त, मुख्य लेखापाल असे नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना रूजु करून घेण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे. महापालिकेच्या सेवेतील अनेक ज्येष्ठ अधिकारी निवृत्त झाले असून, शासनाकडून नवीन आकृती बंधाला अद्याप मान्यता मिळाली नाही. त्यातच मनपा सेवेतील कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित असतांनाच शासकीय सेवेतून मोठ्या प्रमाणात अधिकारी नियुक्त होत आहेत. त्यामुळे स्थानिक अधिकारी कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौर