शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

मुकणे पाणीयोजनेचा फैसला

By admin | Updated: October 16, 2015 22:42 IST

मनपा महासभा : मनसे आक्रमक; शिवसेना भूमिकेवर ठाम

नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत मंजूर झालेल्या मुकणे पाणीपुरवठा योजनेचा फैसला शनिवारी (दि.१७) होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत होणार असून, पाणीयोजनेतील अडथळे दूर होण्यासाठी सत्ताधारी मनसे आक्रमक झाली असतानाच शिवसेना मात्र प्रकल्पातील त्रुटी दूर होण्यासंबंधी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. राज्य शासनाने मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या निविदाप्रक्रियेवरील स्थगिती उठविल्यानंतर शनिवारी होणाऱ्या महासभेत प्रशासनाने योजनेसाठी वाढीव ३६ कोटी रुपयांच्या खर्चास तसेच निविदाप्रक्रियेस मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. शहराची भविष्यात पाण्याची असलेली गरज आणि केंद्र सरकारकडून या योजनेसाठी मिळणारा भरीव निधी परत जाऊ नये यासाठी सत्ताधारी मनसेने सदर योजनेला हिरवा झेंडा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे, तर शिवसेनेने योजनेतील निविदाप्रक्रियेत झालेली अनियमितता आणि अन्य त्रुटींवर बोट ठेवत मनपावर आर्थिक बोजा पडू देण्यास हरकत घेतली आहे. त्यामुळे महासभेत मुकणे पाणीयोजनेवर वादळी चर्चा झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचवेळी सदस्यांकडून प्रशासनालाही घेरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्य शासनाने स्थगिती उठविल्यानंतर उपस्थित केलेल्या मुद्यांवर प्रशासनाने काय कार्यवाही केली, याचा जाब विचारला जाणार आहे. दरम्यान, महासभेत सार्वजनिक उत्सवांच्या प्रसंगी रस्त्यांवर उभारण्यात येणारे मंडप, स्वागत कमानी आदिबाबत परवानगीची कार्यपद्धती निश्चित करण्याचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. तसेच वडाळा शिवारात स्त्री रुग्णालयाच्या प्रस्तावावरही चर्चा झडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)